निर्धार सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न; शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

 



मुंबई(शांत्ताराम गुडेकर )


       जोगेश्वरी पूर्व येथील अरविंद गंडभीर शाळेतील माजी विद्यार्थीनी स्थापन केलेल्या निर्धार ( एक हात आपुलकीचा ) या सामाजिक संस्थेच्या वतीने अरविंद शाळेत रक्तदान शिबिर संपन्न झाले. यात एकूण ६० रक्तदात्यांपैकी पैकी ४५ जण रक्तदानासाठी पात्र ठरले. त्यांचे रक्त संकलन करण्यात आले. प्रथम रक्तदान करण्याचा मान अरविंद जाधव यांना मिळाला. निर्धारचे हे रक्तदान शिबिराचे तिसरे वर्ष होते. माजी विद्यार्थ्यांनी वेळात वेळ काढून शिबिराला उपस्थित राहून रक्तदान केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सहभागही उत्स्फूर्त होता. स्थानिक डॉ. शंकर सावंत (एम.डी) जे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या शुभहस्ते शिबिराचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.गोरेगाव येथील मीनाताई ठाकरे ब्लड बँकेने दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्त संकलन करण्याची जबाबदारी घेतली होती. निर्धारच्या वतीने या आधीही अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून भविष्यातही समाजातील गोर-गरीब, वंचित लोकांसाठी जे जे शक्य आहे ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू असा मनोदय यानिमित्ताने अनेक माजी विद्यार्थ्यांनी  व्यक्त केला. शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्ससिंग ठेऊन शिबीर संपन्न झाल्याचे उपक्रम प्रमुख राजन घाग यांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सुहास गवस, प्रलय पाटील, राहुल गायकवाड, आदींनी खूप मेहनत घेतली.

टिप्पण्या