पांगरी तग्रामपंचायतिच्या वतीने एकूण २०८ कोरोना डोस साठी उच्चांकी लसीकरण अनेकांचे अंदाज ठरले फोल तर नागरिकांचा मोठा प्रतिसाद
प्रतिनिधी: दीपक मांडवकर
पांगरी ग्रामपंचायत नजिक मोठी वाडी सभागृह येथे पांगरी, तळेकांटे, चांदीवणे, घोडवली या गावांतील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी व फ्रंट लाईन वर्कर्स असे एकूण २०८ डोस साठी लसीकरण झाले. गावकर शिवराम तेगडे यांचे शुभ हस्ते श्रीफळ वाढऊन शुभारंभ करताना ग्राम क्रुती दल अध्यक्ष तथा सरपंच सुनिल म्हादे, डॉ. फासके यांचे समवेत अन्य आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील श्वेता कांबळे, ग्रामसेविका चावरे मेडम, तळेकांटे येथील सरपंच सुरेश गुरव, वैदेही बने सरपंच घोडवली, ग्रामपंचायत सदस्य विजय मेस्त्री, पांडुरंग दुडये गुरुजी, बेर्डे गुरुजी, जयवंत म्हादे व अन्य गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सुनिल म्हादे यांचे वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. सकाळच्या सत्रात नेटवर्क कनेक्टिव्हिटी अडचणी मुळे नियोजन करताना व्यत्यय आला होता. त्यानंतर व्यवस्थितपणे नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळून लसीकरण सुरू झाले. २०८ डोस यांपैकी १३२+१ डोस पांगरी येथील नागरिकांना देण्यात आले उर्वरित अन्य गावांतून आलेल्या नागरिकांना देण्यात आले. पांगरी गावात जास्तीत जास्त ३५/४० जण लसीकरण साठी येतील असा ग्राम क्रुती दल सक्रिय सदस्यांकडील माहितीनुसार प्राथमिक अंदाज होता. अन्य गावांतून सकाळी ७:०० वा. लोकांनी येऊन हजेरी लावली होती. इतर गावांतील लोकांचा लसीकरण साठी उत्साह बघून पांगरीतील लोकांचे मनोबल उंचावले होते अशी चर्चा ऐकायला मिळत होती. पुढं भविष्यात सरकारी योजने करिता लसीकरण केले आहे का ? असं विचारले देखील जाऊ शकते या शक्यतेमुळे काहींनी लसीकरण करून घेणे पसंत केले होते. पांगरी गावात १३२+१ डोस साठी लसीकरण होऊन आरोग्य कर्मचाऱ्यां सोबत सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरले होते. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी व नाव नोंदणी साठी कोळंबे हायस्कूल येथील शिक्षक खांबे, शिंदे, आरोग्य सहाय्यक रमेश उमते, प्रदीप पोमेँडकर, योगेश दातार, हरेश म्हादे, प्रज्ञा मांडवकर या सर्वांचे सहकार्य लाभले होते. डोस देणे साठी कदम मेडम, बडद मॅडम यांचे समवेत नाव नोंदणीसाठी अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप म्हादे, दत्ताराम जाधव,आशा सेविका, मदतनीस इ. चे मोलाचे सहकार्य झाले होते.
मोठी वाडी सभागृह येथील प्रशस्त जागा असल्यामुळे नियोजन करणे त्रासदायक झाले नाही असे आरोग्य कर्मचारींनी मत व्यक्त केले होते. मोठी वाडीतील ग्रामस्थांनी सभागृह येथील जागा उपलब्ध करून देऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना आयत्या वेळी नाश्ता - पाणी व दुपारचे जेवण बनऊन देणे साठी वाडीतील महिलांनी मोठं सहकार्य केले होते. गावच्या विकास बाबत विधायक कामांसाठी मोठी वाडीचे नेहमीच मोलाचे सहकार्य मिळत असते. याबाबत सरपंच यांचे कडून वाडीतील ग्रामस्थांचे योगदान बद्दल विशेष उल्लेख केला. गावांतील श्री. विठ्ठल पानगले श्री. तुकाराम पानगले यांसारख्याकाही ज्येष्ठ मंडळीनी उशिरा येऊन सावकाश - शांतपणे लसीकरणाचा लाभ घेतला. कोणतीच घाई - गडबड केली नाही. इतर गावांतून आलेल्याना आधी आटोपून जाऊदे नंतर आपण निवांत पणे लसीकरण करून घेऊ असे त्यांचे म्हणणे होते.
गावात लसीकरण व्हावे अशी ग्रामस्थांची मोठी मागणी होती. परंतू सुरुवातीला पांगरी ग्रामीण भागा मध्ये लसीकरण करणे शक्य नाही याबाबत आरोग्य कर्मचारींनी सांगितले होते. पण सुदैवाने सरकारी नव्या नियमानुसार ग्रामीण भागांतून अखेर लसीकरण यशस्वीपणे पार पडत आहे. याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागात ज्येष्ठ मंडळींसाठी टोकन पदधतीने लसीकरण व्हावे अशी मागणी केली होती.
उपस्थित मान्यवरांचे लसीकरण नियोजन बाबत लाभलेल्या योगदानाबद्दल आपल्या मनोगत मध्ये सरपंच यांनी कौतुक केले तसेच लसीकरण नियोजन बाबत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबाबत समजून घ्यावे असे सांगितले. आयत्या वेळी असुनदेखील छान नियोजन झाले होते याबाबत वैदेही बने मेडम सरपंच घोडवली या बोलत होत्या. पुढच्या वेळी याही पेक्षा नेटके नियोजन सर्व मिळून करूया अस त्या म्हणाल्या. आपल्या मनोगत मध्ये डॉ. फासके सर यांनी लसीकरण नियोजन बाबत संपूर्ण टीम चे अभिनंदन केले होते. व १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लसीकरण साठी यादी बनऊन ठेवण्याबाबत ग्राम क्रुती दल सदस्यांना सांगितले. शेवटी सरपंच यांच्या वतीने उपस्थितांचे आभार प्रदर्शन कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा