मा. आमदार विनयजी नातू (गुहागर) आणि कुणबी युवा संघर्ष समिती वसई- विरार यांच्यावतीने गरजु कुटुंबातील महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे विरार येथे केले वाटप
विरार: प्रतिनिधी दीपक मांडवकर
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या निमित्ताने विरार कारगिल नगर, मनवेलपाडा (विरार- पूर्व) विभागातील गरीब व गरजु, व निराधार कुटुंबातील महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटमध्ये तांदुळ, साखर, चहापावडर, मसाला, हळद, कांदे, बटाटे, मसुर डाळ, मुगडाळ, अक्के चणे, मीठ, बिस्कीटे,फेस मास्क, पाण्याची बॉटल याबरोबरच इतर अनेक वस्तूंचा समावेश होता.
कुणबी युवा संघर्ष समिती वसई- विरार श्री. दिपक भरणकर आणि सचिन जोशी यांच्या पुढाकाराने १०० निराधार महिलांना धान्य किट वाटप करताना अनाथांचे नाथ म्हणून धावून आले ते गुहागर तालुक्याचे माजी आमदार" विनयजी नातू साहेब" यांच्या संयुक्त सहयोगाने अनाथ निराधार महिलांना जिवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी १०० अनाथ विधवा महिलांसाठी किराणा किट वाटप करण्यात आले. यावेळी मनवेलपाडा मधील समाज सेवक मा. विनोदजी पाटील व माजी नगरसेविका हेमांगी ताई पाटील, समाजसेवक नारायण मांजरेकर, लष्करे मॅडम, निलेश आचरेकर, कदम सर, पत्रकार दिपक मांडवकर, कुणबी समाजोन्नती संघ वसई शाखेचे अध्यक्ष श्री. गांवणकर, तुकाराम रांगळे, पांडुरंग कावणकर, निलेश पालांडे, संतोष नवाले, मनोज डाफळे, वैभव नामोळे, निलेश पालांडे, संतोष कानसे, विवेक डिंगणकर, नंदकुमार केंद्रे, चंद्रकांत पाष्टे, चांदीवडे, अजित लाखण, संदीप ठोंबरे, महेंद रामाणे, वैभव करंबेळे, कमलेश बाईग, रमेश शिवगण, घरतजी, संजय मांडवकर इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
विशेष सहकार्य : संतोष नवाळे प्रभाकर चिबडे, साहील मंगेश डाफले, दिपक वनगुळे, बळीराम भातडे, अजित लाखण, दिपक भरणकर, सुभाष चांदिवडे, पांडुरंग कावणकर, निलेश पांदे या सर्वांचे आभार मा.सचिन जोशी यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा