कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सलग्न कुणबी युवा शाखा घाटकोपर- विक्रोळीतर्फे मुलुंड तहसीलदार कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी युवा मंडळ मुंबईचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, शिलेदार तसेच ओबीसी जनमोर्चा-महाराष्ट्र,ओबीसी संघर्ष समन्वय समिती,ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती तर्फे आज गुरुवार दि. २४  जून २०२१रोजी सकाळी ११ वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन ‘ओबीसी आक्रोश निदर्शने” महाराष्ट्रातील सर्व तहसील कचेरीवर एकाच वेळी करण्यात येत असून येणार असून आगरी-भंडारी-कुणबी-कोळी-तेली-माळी-धनगर-वंजारी-कोष्टी-कुंभार-लोहार, नाभिक, गुरव, अशा सर्व ओबीसी मधील जाती तसेच  भटके विमुक्त या वर्गात येणाऱ्या सर्व समाज बंधू, भगिनी, विद्यार्थी, यांनी आक्रोश निदर्शनात  कोरोनाचे सर्व नियम पाळून सहभाग घेतला.कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई कुणबी युवा मंडळ मुंबई शाखा घाटकोपर- विक्रोळीच्यावतीने मुलुंड तहसील कार्यालय, मुलुंड पश्चिम येथे ओबीसी आक्रोश निदर्शन करण्यात आले.त्यानंतर मुलुंड तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदनही दिले.या आंदोलनात आपले हक्क,आरक्षण,अधिकार वाचविण्यासाठी नवी मुंबईचे नगरसेवक मा.उपमहापौर अविनाश लाड,भास्कर चव्हाण,सोनू शिवगण, शरद भावे,आत्माराम बाईत, प्रकाश वालम, सुरेश मांडवकर, संजय जाधव,दत्ताराम चांदीवडे, सुहास बोळे, वसंत राऊत, अनंत खामकर, दिलीप कातकर, विवेक वालम,मंगेश मांडवकर, मनीष वालम, अमित धनावडे,सौ.अश्विनी बाईत,सौ.शीतल मांडवकर,सौ.अंजली थोरे,सौ. नीता पाष्टे,श्रीमती यशस्वी काष्टे, सौ. सुनीता काप सूर्यकांत सरफळे यांच्यासह शाखेचे आजी-माजी पदाधिकारी,सदस्य व सभासद उपस्थित होते. सोनू शिवगण,प्रकाश वालम,अविनाश लाड, भास्कर चव्हाण,सुरेश मांडवकर,शरद भावे आदींनी यावेळी महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करत आंदोलन का व कशासाठी  हे स्पष्ट केले.

टिप्पण्या