कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांनी उभी केलेल्या वैद्यकीय टीमची दमदार कामगिरी

  



गुहागर: दिपक मांडवकर

        रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर पुणे राहणाऱ्या तालुक्यातील कोरोना ग्रस्त रुग्णाना लागणारे सर्व सहकार्य ही टीम चांगल्या प्रकारे करत आहे. या वैद्यकीय टीम चे प्रमुख मार्गदर्शकडॉ विनयजी नातू , डॉ राजेंद्र पवार (गुहागर तालुका)हे प्रत्येक वेळी या सहकार्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत. म्हणून आता पर्यत तालुक्यातील जिल्हातील ४०० पेक्षा जास्त रूग्णांना या टीम ने सहकार्य केल. या टीम चे प्रमुख शिल्लेदार श्री. मनोज डाफले, श्री संदीप पिलणकर, श्री गणेश पालकर, सौ अनन्या ताई गोणबरे, कु अंकिता कांबळे, श्री संतोष निंबरे हे सर्व प्रमुख जबादारी घेऊन काम करत आहेत. त्याला गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले. या टीम मधे तालुक्यातील मुंबई ठाणे पालघर आणि गुहागर मधील २० डॉक्टर १०० परिचारिका आणि ८० इतर वैद्यकीय सेवेतील बांधव काम करत आहेत. या  संपूर्ण वैद्यकीय टीमचे तालुक्यातील जनतेने कौतुक केले.

टिप्पण्या