विरार येथे कुणबी जनसंपर्क कार्यालयाचे युवाध्यक्ष माधव कांबळे यांच्या हस्ते उदघाटन
विरार: दिपक मांडवकर
वसई- विरार विभागात आपला कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आणि अश्या बहुसंख्येने असलेल्या समाजाला एका व्यासपीठावर घेऊन येणे आणि या बहुजन समाजाला एक आपली एक हक्काची जागा असावी या उद्देशाने कुणबी युवा वसई- विरार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर भेरे यांच्या सहकार्यातून समाजाच्या बांधवांना हक्काचं ठिकाण आणि कुणबी समाजाच्या प्रत्येक बांधवांनी आता संघर्षा साठी एकवटले जावे म्हणून विरार नगरीत काल गुरुवार दिनांक १७ जून २०२१ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता कुणबी जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला कुणबी युवा मुंबई चे युवाध्यक्ष श्री माधवजी कांबळे,समाज भगिनी विरार मधील राजकिय नेतृत्व समाज सेविका, मा. नगरसेविका सौ संगीताताई भेरे मॅडम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कुणबी युवा ब्रिगेड प्रमुख श्री. योगेशजी मालप, कुणबी समाजाचा पत्रकारितेतील ज्वलंत आवाज पत्रकार श्री दीपक मांडवकर, वसई शाखा संघटक श्री अनंतजी फिलसे, कार्यसम्राट श्री. कीशोर भेरे, मनवेल पाडा सामाजिक संघटना अध्यक्ष श्री दिलीप सुर्वे तसेच कुणबी युवा वसई विरार चे कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी अध्यक्ष अविनाश पाचकले, उपाध्यक्ष संदीप मांडवकर, उपाध्यक्ष श्री अरुण ठोंबरे, सचिव श्री विलास सुवरे, खजिनदार श्री दीपक चौगुले, उप सचिव श्री शैलेश दळवी, उपसचिव श्री एकनाथ डिंगणकर, संपर्क प्रमुख श्री संभाजी मालप, सल्लागार श्री सुनील रेवाळे, विनायक निंबरे, श्री नरेंद्र बोरजे, श्री मनोज भागडे, श्री शैलेश बामणे, श्री संतोष धुमक, तसेच वीरार मधील युवा कार्यकर्ते यशवंत भानसे, संदीप शिंदे, सुनील शेलार, दिनेश सुर्वे, दीपक भरणकर, विवेक डिंगणकर, सौ गीता मांजरेकर, प्राजक्ता कातकर, नीलिमा धोकटे, कांचन रांगडे, अंकिता ठोंबरे, प्रिया गांधी, किरण धोकटे, संतोष चव्हाण, आशिष मेंगे, कु. प्रणय मंचेकर, समर्थ रेवाळे, परशुराम कातकर, श्री सुभाष सरवनकर इत्यादी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांना शाल व तुलसीवृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी समाजाप्रती आपले विचार समाज बांधवांसमोर मांडले. आणि कुणबी युवा वसई विरार च्या या कुणबी जनसंपर्क कार्यालयाला शुभेच्छा देऊन असेच कार्य पुढे घडत राहो अशी ईच्छा देखील व्यक्त केली. त्याचप्रमाणे कुणबी समाजाचे नेतृत्व सल्लागार श्री सुनील रेवाळे यांचा वाढदिवसा निमित्त केक कापून सर्वांनि साजरा करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवर आणि समाज बांधव यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा