आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जिवाजी बाबुराव राणे स्मृति प्रतिष्ठान तर्फे ऑक्सिजन कॉनसंट्रेटर वाटप




चिपळूण: दिपक मांडवकर

           चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार शेखर सर निकम यांच्या माध्यामतून संस्था कोविड सेंटर ला वेगवेगळ्या प्रकारे गेल्या महिना भरात मेडिकल साहित्य देऊन मदत करत आहे. याच अभियानाचा एक मोठा भाग म्हणून  डॉ. किसन पाटील संजीवनी हॉस्पिटल सावर्डे, आणि डॉ. अभिजित सावंत श्री हॉस्पिटल चिपळूण संचलीत कोविड सेंटर येथे प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉनसंट्रेटर डोनेत करण्यात आले. हॉस्पिटलस् ना आणि पर्यायाने पेशंटस् ना ऑक्सिजन ची कमतरता असताना या मशीन मुळे स्वस्तामध्ये ट्रिटमेंट मिळून खूप मदत होणार आहे .  

             योग्य ठिकाणी योग्य ती गरजेची वस्तू मिळावी म्हणून निकम सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . मुंबईहून युवा परिवर्तन  आणि लाईफ विन फौंडेशन  यांनी शब्द दिल्या प्रमाणे संस्थेला मदत केली त्यामुळे संस्था गेल्या महिनाभरात खूप मदत करून शकली. संस्थेच्या अध्यक्षा स्मृति राणे यांनी मा. निकम सर, युवा परिवर्तन आणि लाईफ विन फौंडेशन मुंबई, खूप चांगल्या प्रकारे पेशंटस् ना सुविधा देणारे डॉ. किसन पाटील आणि डॉ. अभिजित सावंत यांचे आभार मानले आहेत. असेच मदत करणारे आणि मदत घेणारे हात पुढे यावेत अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या