कोकण कट्टा तर्फे बालग्राम साठी २ टन धान्य व इतर साहित्याचे वाटप
मुंबई(शांत्ताराम गुडेकर )
आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोकण कट्टा विलेपार्ले येथील स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी भिक्षाफेरीतून जमा झालेले दोन टन तांदूळ आणि अडीचशे किलो डाळ इतर साहित्य व पाच हजार रुपयेची मदत पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या अनाथ, वंचित आणि आदिवासी बालकांच्या "बालग्राम" ला करण्यात आली यावेळी झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे, खजिनदार सुजित कदम, सदस्य हर्षल धराधर, जगन्नाथ गावडे दया मांडवकर सुनील वनकुद्रे, दीपक राणे, विनोद आचरेकर, रवी पाटील जयवंत जोशी दशरथ पांचाळ यांच्यासह महिला कार्यकर्त्या विजया मांडवकर, सुरेखा वाघे, राजश्री म्हामुणकर रेखा कालेकर, नीता वाघे, प्रशिक्षणार्थी , बालक उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना कोकण कट्टा चे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांनी सांगितले की यापुढेही या बालकांना लागणाऱ्या इतर दैनंदिन वस्तूंच्या पूर्ततेसाठी कोकण कट्टा प्रयत्न करेल. तर आभार व्यक्त करताना ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी उपस्थितांना संस्था करीत असलेल्या कार्याविषयी आणि "बालग्राम" प्रकल्पबद्दल माहिती देत कोकण कट्टा ने भीक्षा फेरीच्या माध्यमातून केलेली मदत ही निश्चितच मोलाची असून या भीक्षा फेरीला मदतीचा हात देणाऱ्या सर्व देणगीदारांचे आम्ही ऋणी आहोत असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली यावेळी बालग्राममधील पालकांना व बालकांना कलाकौशल्य च्या माध्यमातून अर्थार्जन होण्याच्या उद्देशाने कोकण कट्टा व व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने नारळाच्या करवंटी पासून विविध शोभिवंत व गृहपयोगी वस्तू बनविण्याच्या प्रशिक्षणाचे शुभारंभही करण्यात आले असून प्रशिक्षक हर्षल धराधर यांनी करवंटीपासून वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना दिले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प समन्वयक उदय गावंड, जनसंपर्क प्रमुख राजेश रसाळ यांच्यासह बालग्राममित्र राजेश पाटील, जयेश म्हात्रे, तेजस चव्हाण, शैलेश कोंडसकर आणि जयेश शिंदे, त्रिवेणी (वैष्णव) पाटील, सचिन पाटील आणि सुनील विश्वकर्मा यांनी मेहनत घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा