मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर येथे २५० सफाई कर्मचाऱ्याना धान्य व रेनकोटचे वाटप

 


मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

                       मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम यांच्या उपस्थितीत घाटकोपर प्रभाग १२९ चे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांच्या वातिने विभागातील २५० सफाई कर्मचारी यांना मोफत धान्य व रेनकोट चे वाटप करण्यात आले. कोरोना च्या सध्या परिस्थितीत राज ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असला तरी कार्यकर्त्यानी सामाजिक जाणिव राखत कोरोना काळात योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या सफाई कर्मचारी याना मदतीचा हात म्हणून धान्य वाटप करत वाढदिवस साजरा केल्याचे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी सांगितले.

टिप्पण्या