लांजा प्रभानवल्लीतील निराधार आजोबांच्या घर दुरुस्तीसाठी तुमच्या मदतीची गरज
निराधार श्री. महादेव यशवंत जाधव गेले चार वर्षे घरकुलाच्या प्रतिक्षेत,घर पडायला आले तरी योजनेचा लाभ नाही
लांजा I दिपक मांडवकर
लांजा प्रभानवल्ली येथील निराधार बाबा श्री महादेव जाधव हे केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या आंधळ्या कारभारामुळे अनेक यातना भोगत आहेत.या आजोबांनी गेले चार वर्षे घरकुलासाठी प्रयत्न केला,मात्र त्यांचे घर पडायला आले तरी त्यांना केंद्र शासनाची हक्काची घरकुल योजना मिळाली नसल्याने स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत? मात्र पाऊस,वादळ यांचा संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक गावकऱ्यांनी या शासनाच्या योजनेकडे न पाहता घर दुरुस्तीच्या कामाला सुरवात करुन मदतीचा हात पुढे केला आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी,सरकारी कर्मचारी,सरपंच झोपा काढत आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत.
लांजा तालुकातील प्रभानवल्ली गावात ६५ वर्षाचे निराधार श्री. महादेव यशवंत जाधव अत्यंत बिकट परिस्थितीत राहत आहेत. त्यांनी आपल्याला केंद्रीय घरकुल योजनेतून सरकारचे घर देईल या आशेवर चार वर्षे वाट पाहत आहेत.मात्र त्यांच्या या उतारवयात सर्वच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं आहे.निराधार असूनही त्यांना घरकुल योजना का मिळाली नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.लांजा तालुक्यात या निराधार आणि वृद्ध व्यक्तींना घरकुल योजना लागू नाही का? असा सवाल केला जात आहे.तालुक्यातील सरकारी यंत्रणा,लोकप्रतिनिधी यांच्यावरचा विश्वासच उडाला असून त्यामुळे त्यांच्याकडून लोकांना न्याय मिळेल ही अपेक्षाच सोडण्यात आली आहे.
आजोबांचे घर म्हणजे जंगलातील लाकडी खोपट आहे. गेल्या चार वर्षात थंडी-पाऊस आणि कडाक्याच्या उन्हाचे चटके कसे सोसले असतील. याची कल्पना देखील करणे विचारांच्या पलीकडे आहे. यांच्या पश्चात दोन मुली त्याही वडिलांना प्रमाणे अत्यंत गरीब. त्यांच्या साठी माहेर घर म्हणजे काय? असा एकादा प्रश्न पडला की यांची दैयनिय आणि दुर्मीळ जीवनयातने साठी केवळ प्रशासन जबाबदार आहे.
पुर्वी महादेव यशवंत जाधव यांनी आपले घराचे घरकुला साठी लागणारे सर्व कागद पत्र ग्रामपंचायतीत समाविष्ट करून चार वर्षे झाली. अजून शासनाकडून कोणहीती हालचाल नाही. म्हणून गावातील ग्रामस्थांनी पुढाकाराने घेत घराची सावली मिळावी म्हणून प्रत्येकाने थोडा फार निधी जमा केला. आणि या गावातील मेस्त्रींनी एकही रुपया न घेता या बाबांचे घर बांधण्याचा पुढाकार घेतला आहे.
पण शासनाने आज पर्यंत दखल घेतली नाही. आता केवळ अर्धे घर उभे आहे. आणि उरलेले घर केवळ पैशा अभावी बाकी आहे. आता खरी माणुसकीची जाण म्हणून त्या बाबांना असंख्य मदतीच्या हातांची गरज आहे. वरून पाऊस आणि वादळ या बाबांनी आपल्या आयुष्यातील क्षण बिकट परिस्थितीत घालवले.आता मात्र पावसाचे दिवस आहेत.बाबांच्या घराचे थोडे काम उरले आहे.म्हणुन आम्ही आपणांस विनंती करतो की आपण या बाबांसाठी छोटी मोठी मदत करावी,जेणेकरुन त्यांचे अर्धवट राहीलेले घर पुर्ण होईल.
सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरां त्या बाबांच्या वतीने विनंती आहे. आपण नक्की त्यांना मदतीचा हात द्यावा. महादेव यशवंत जाधब बँक खात्याची पूर्ण माहिती bank ok india ( बँक ऑफ इंडिया 144110510000063) IFSC code: BKID0001441 शाखा : प्रभानवल्ली,अधिक माहीतीसाठी Ravindra chavan
9930919103 यांच्याशी संपर्क करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा