संगमेश्वर पांगरी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी आणि मास्क व सॅनिटायझरचे वाटप
संगमेश्वर: प्रतिनिधी दिपक मांडवकर
संगमेश्वर: माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत तपासणी करून उपचार देणेची मोहिम पांगरी ग्रामपंचायतीच्या मार्फत दिनांक ५ मे पासून सुरु झाली. यासाठी ४ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी होणार आहे. अशी माहिती सरपंच श्री. सुनील म्हादे यांनी दिली. तर प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांचे तापमान तपासण्यात येत आहे. तसेच ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांची सहा मिनिटांची वॉकिंग टेस्ट घेऊन ऑक्सीमीटरद्वारे त्यांची तपासणी केली जात आहे. त्यांची ऑक्सिजन लेवल ९५ च्या खाली असेल तसेच ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलटी, अशी लक्षणे असतील तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत अशा व्यक्तिंची अँटीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्यसाठी पाठवण्यात येत आहे. गृहभेटी देण्याऱ्या या विशेष पथकात ग्राम कृती दलाचे अध्यक्ष तथा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलिसपाटील तसेच वाडीतील ग्रामस्थ यांचा समावेश आहे. हे पथक दररोज ५० कुटुंबाना भेटी देत आहे. कोरोनाबाबत जनजागृती आणि मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून गृह विलगीकरण कसे असावे याबाबत माहिती दिली जात आहे. गावातील नागरिकांच्या मनात असलेली भीती घालवणे, लसीकरणाची आवश्यकता तसेच उपलब्ध असलेली उपचार पध्दती यावर सविस्तरपणे माहिती देण्यात येत आहे. या मोहिमे साठी गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढला असल्याने या मोहिमेमुळे त्याची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा