तुंबाडमध्ये कोवीशिल्डच्या प्रथम डोसच्या लसीकरणास उत्स्फूर्द प्रतिसाद
खेड: प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे बुधवार दि २६/५/२०२१ रोजी ग्रामपंचायत तुंबाड यांच्या प्रयत्नाने व कोरेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने मौजे तुंबाड, ता.खेड येथे कोविशिल्ड लसीचे लसीकरण उत्साहात पार पडले. लसीकरणास गावातील वय वर्षे ४५ वरील १२१ ग्रामस्थ व महिलांनी उत्स्फूर्द प्रतिसाद देत प्रथम डोसचे लसीकरण करुन घेतले.
ग्रामस्थांनी लसीकरण करून घेण्यासाठी सरपंच श्री. बंडू कदम, पो.पाटील हरिश्चंद्र कदम, ग्रा.पं.सदस्य श्री.रविंद्र निकम, तंटामुक्त अध्यक्ष श्री.रामचंद्र घडशी, श्री. योगेश बिर्जे, शरद कदम (गुरुजी), जानु कदम, श्री.परशुराम जावळे, श्री.बबन शिदें, श्री.धोंडू कदम यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.
कोरेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर श्री.मोरे सर, आरोग्य सेवक श्री. अभिषेक मोडसिंग, आरोग्य सेविका कोरवी मॅडम तसेच त्यांची संपूर्ण टिम आशा सेविका शिंदे, घोलप अंगणवाडी सेविका अंजू कदम मॅडम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.खेडेकर सर, लिपिक घोलप सर, संदिप तांबे यांचे उत्तम सहकार्य लाभले. यावेळी सरपंच श्री. बंडू कदम यांनी ग्रामस्थ डॉक्टर व त्यांच्या संपूर्ण टिमचे आभार मानले, तसेच वंचित राहिलेल्या ग्रामस्थांसाठी लस उपलब्ध होताच त्वरित पुन्हा असेच लसीकरण करुन घेण्याची व करण्याची विनंती केली.
तालुक्यातील खाडीपट्टा विभागात कोरोना मुक्त गाव आतापर्यंत गावात एकही पेशन्ट नाही ग्राम कृती दलाचे उत्कृष्ट नियोजन आरोग्य विभागाचे उत्तम सहकार्य व ग्रामस्थांच्या सजगते मुळे गाव सुरक्षित असल्याने परिसरातून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा