निशा परूळेकर (उपाध्यक्षा- चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र) तर्फे मदतीचा हात

 



मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

                भारतीय जनता पार्टी (मागाठाणे विधानसभा) प्रभाग  क्र.२५ तर्फे निशा परूळेकर (उपाध्यक्षा-महाराष्ट्र) भाजपा चित्रपट कामगार आघाडी यांना जानूपाडा येथील काही रहिवाशांनी संपर्क करून नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने घराचे पत्रे उडून गेल्याचे सांगितले. झालेले नुकसान लक्षात घेऊन परुळेकर यांनी त्यांना या बिकट परिस्थितीत हातभार म्हणून स्वखर्चाने पत्र्यांसाठी आर्थिक मदत केली. त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल लाभार्थीने निशा परुळेकर यांचे आभार व्यक्त केले.तर लक्ष्मण  यादव(वाॅर्ड अध्यक्ष) यांच्यासह स्थानिकांनी परळेकर यांना धन्यवाद देत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या