मुंबईच्या मातोश्री सेवाधाम ट्रस्टतर्फे देवगड जामसंडे नगर पंचायतच्या कोविड सेंटरला औषधे व संरक्षक सामग्रीचा मदतीचा हात



मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

              मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ.मनोज भाऊ चव्हाण यांनी राज्यातील काही कोविड केअर सेंटरना औषधे व संरक्षक सामग्री मदत म्हणून देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून देवगड तालुक्यातील देवगड कोविड केअर सेंटरला मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टच्यावतीने ट्रस्टचे विश्वस्त तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांच्या हस्ते कोविडच्या उपचारासाठी शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मागणी केलेली औषधे, पीपीई किट, फेस शिल्ड, सेनीटायझर, इत्यादी वस्तूंची मदत करण्यात आली. देवगड जामसंडे न.प.व आमदार नितेशजी राणे यांच्या विनंती वरून डॉ. मनोज चव्हाण यांनी देवगड जामसंडे नगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरला रुग्णांसाठी लागणारी औषधांचा संच,पि. पि. इ किट,फेस शिल्ड मास्क, फेस मास्क, ॲप्रन व जंतुनाशक असे साहित्य देवगड आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत न. प. आरोग्य विभागाला सुपूर्त केले.याप्रसंगी मातोश्री ट्रस्टतर्फे ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ.मनोज भाऊ चव्हाण, संदीपजी परब   व ट्रस्टचे हितचिंतक समीर खाडिलकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, शिक्षण आरोग्य सभापती संजय तारकर, डाँ भगत, डाँ अर्चना मर्गज इत्यादी प्रमुख उपस्थित होते.या सुविधा उपलब्ध करण्यासाठी "मस्त" म्हणजेच मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अमित बने, श्री सचिन खडपकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाचे आयोजक संतोष गोपाळ मयेकर होते. संस्थेच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले असून डाँ.मनोज चव्हाण व सहकारी यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पण्या