लोकनेते मा.श्री अविनाशदादा लाड यांची लांजा खानवली गावातील निराधार वृद्ध महिला यशोधा मांडवकर यांना दिला आधार
अन्नधान्यासह,बेड आणि घराच्या बांधकामासाठी केली आर्थिक मदत
लांजा-मे,२८ – लांजा तालुक्यातील
खानवली मांडवकरवाडी येथील निराधार वृद्ध महिला यशोदा मांडवकर यांची भेट घेत नवीमुंबईचे
माजी उपमहापौर व लोकनेते मा.श्री अविनाशदादा लाड यांनी किराणा किट ,बेड आणि
घराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.त्याच्या या कार्याबद्दल
स्थानिक नागिरांनी आभार व्यक्त केले आहेत.
लांजा तालुक्यातील खानवली
मांडवकर वाडी येथील वृद्ध महिला यशोदा मांडवकर या गेली कित्येक वर्षे पडक्या घरात
राहत आहेत. घराचे बांधकाम केव्हाही पडेल अशी अवस्था त्यांच्या घराची झाली होती.
अनेकवेळा त्यांनी स्वताच्या हक्काच्या घरासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता.मात्र
त्याकडे स्थानिक नेते ,पुढारी यांनी दुर्लक्ष केले होते.कदाचित त्यांना घर पडून
नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळात नुकसान सोसावे लागणार होते.ही समस्या लक्षात
घेवून स्थानिक गावकरी,मुंबईकर चाकरमानी यांनी प्रशासनाच्या कोणत्याही आशेवर न
राहता घराचे बांधकाम पुर्ण करुन देण्यासाठी पै पै जमा केली होती.ही बातमी अविनाश
दादांना कळाली.
या समस्येची लोकनेते मा.श्री अविनाशदादा लाड
यांनी गांभीर्याने दखल घेत आज आजीच्या घरी जावून भेट घेतली.घरासाठी बांधकाम
कामगारांच्या मजुरीची समस्या होती.ती त्यांनी सोडविली.तसेच आजीच्या घरात किराणा
किट सुपुर्द केले आणि आजीला एक बेडचीही सोय केली.अशी मातृसेवा आज मा.श्री अविनाश
दादा लाड यांच्या हस्ते जुळून आली.त्यामुळे लांजा तालुक्यासह खानवली पंचक्रोशीतून
त्यांनी लावलेल्या हातभाराचे कौतुक होत आहे.
यावेळी वाघणगावचे उपसरपंच
संकेत माईल,कनकाडे काव साखरपाचे श्री संतोष गोताड,अल्प संख्यांक सेलचे नंदु
पावस्कर,संयोग बेरे,ओमकार आंब्रे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा