लोकनेते, नवी मुंबई माजी उपमहापौर अविनाश लाड यांची राजापूरातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत
राजापूर (प्रतिनिधी) राजापूर तालुक्यातील नागरिकांना तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला असून अद्याप कोणतीच शासकीय मदत मिळाली नसताना स्थानिक लोकनेते आणि नवी मुंबईचे माजी उपमहापौर यांनी नागरिकांना सावरता यावे यासाठी विविध प्रकारची मदत देवू केली आहे.लाड यांच्या या सत्कार्यामुळे राजापुरातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले साहेब यांनी राजापूरातील तुळसंदे, कुवेशी येथील तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दौऱ्यावर असताना नागरिकांनी झालेल्या नुकसानीची कैफियत मांडली त्यांच्यासमोर मांडली होती.याची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही बाब नवी मुंबईचे माजी उपमहापौर व कर्तव्यदक्ष स्थानिक लोकनेते श्री अविनाश लाड साहेब यांच्या कानावर घालत तात्काळ शक्य ती मदत करण्याचे आदेश दिले.
नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत स्वखर्चाने राजापूर लांजा साखरपा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री नुईद काझी यांच्याकडे मदत सुपूर्द करत गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची सूचना दिली या सूचनेनुसार कुवेशी येथील श्री.भारस्कर आणि तुळसुंदे येथील रामा खडपे व वैभव खडपे यांना प्रत्येकी बेड आणि अन्नधान्यचे किट तसेच जैतापुर परिसरातील काही गावामध्ये नुकसानग्रस्त गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे किट वितरीत करण्यात आले. या वितरण प्रसंगी राजापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष हर्षद मांजरेकर सुबोध मांजरेकर,काँग्रेस विभाग अध्यक्ष श्री.वैभव कुवेसकर कुवेशी ग्रामपंचायतीच्या च्या सरपंच सौ. मोनिका कांबळी ,उपसरपंच श्री.शामा नाटेकर,जेष्ठ कार्यकर्ते श्री मनोहर कांबळी ,ग्रामपंचायत सदस्य नम्रता रुमडे, अनिल बावकर, नितीन देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा