अदाणी इलेक्ट्रिसिटी दक्षिण विभाग मुखकार्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना


मुंबई( शांत्ताराम गुडेकर)

           महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुनर्स्थापना  सोहळा ४ था मजला, एल एँन्ड टी, सिटी -२, कुर्ला कलिना रोड, सांताक्रूझ (पूर्व) येथील अदाणी इलेक्ट्रिसिटी दक्षिण विभाग मुखकार्यालय येथे करण्यात आली.यासमयी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना खासदार श्री.गजानन कीर्तिकर तसेच  मानव संसाधन विभागप्रमुख श्री. मनोज शर्मा तसेच आमदार श्री. विलास पोतनीस व अदानी एच.आर प्रमुख श्रीमती चंदा वनमाळी, शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना अध्यक्ष मान.श्री.कुणाल सरमळकर यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या