ठाण्यातील भाजपाचे महेश मोरे यांचा राज्यस्तरीय कोरोनायोद्धा समाजरक्षक महासन्मानाने गौरव होणार

 


ठाणे (प्रतिनिधी) अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आणि विश्वात्मक मराठी साहित्य परिषद (द्वारा मविलोअ) यांच्या सहकार्याने संपन्न होणाऱ्या अत्यंत लक्षवेधी कोरोना योद्धा समाज रक्षक महासन्मान 2021  या ऑनलाईन उपक्रमामध्ये ठाण्यातील भाजपाचे कामगार आघाडीचे कोकण प्रदेश सरचिटणीस श्री महेश मोरे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

 कोरोना संकटात केलेले उल्लेखनीय सामाजिक कार्य, रुग्ण सेवा, जनजागृती, प्रबोधनपर सेवा आणि आरोग्य विषयक प्रकल्प या गौरवास्पद कार्यासाठी खास महासन्मान मानपत्र ऑनलाईन सोहळ्यात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. त्यानुसार कोविड योद्धा ऑनलाईन महासन्मान सोहळ्यासाठी श्री महेशे मोरे यांची महासन्मान मानकरी म्हणून निवड सुनिश्चित करण्यात आली आहे.

   श्री महेशे मोरे यांनी कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कोरोना योद्धा म्हणून अतिशय अभिमानास्पद कार्य केले आहे. त्यांच्या या मानव सेवेला ठाणे,मुंबईसह सर्वच ठिकाणाहून कौतुक करण्यात येत आहे.गेली दोन वर्षे त्यांनी ज्यांना अन्न नाही त्याला अन्न पाणी नाही त्याला पाणी देवून अविरत सेवा केली आहे.रस्त्यावरील, हाताच्या पोटावर असलेली अनेक कुटूंबांना मोरे यांनी कोणतीही तमा न बाळगता सेवा केली आहे.आजही त्यांची सेवा अविरत चालू आहे.ज्यांची आजही भुकमार होत आहे त्यांच्यासाठी प्रथमतः मोरे धावून जात आहेत.त्यांचे हे कार्य अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे.

टिप्पण्या