कोकणातील नुकसानग्रस्तांना सरकार ताकदीनीशी मदत करेल – नाना पटोले

तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या कोकणच्या रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यावर असता काल कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी जाऊन मच्छीमारांची व विविध नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व समस्या ऐकून घेतली.

रत्नागिरी ( प्रतिनिधी) तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई देताना सरकार भेदभाव करणार नाही,सरकार पुर्ण क्षमतेने मदत करेल असा विश्वास कांॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.रत्नागिरी जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद सादला.

तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रत्नागिरी दौऱ्यावर आले होते.त्यांनी रत्नागिरीतील मिरकरवाडा जेट्टीला भेट देवून नुकसानग्रस्त मच्छिमार नौकांची पाहणी व नुकसानीबाबत मच्छिमारांकडून माहीती घेतली.वादळाच मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे.मिरकरवाडा येथील सुमारे 28 मच्छिमार नौका बांधित झाल्या आहेत.या सर्व नुकसानीची नाना पटोले यांनी माहीती घेतली.यावेळी रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघाचे बाबामिया मुकादम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समस्या सांगितल्या.

 यावेळी माजी खासदार हुसैन दलवाई,प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप,प्रदेश चिटणीस रमेश कीर,कांॅग्रेस नेते नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड,माजी आमदार हुस्नबानू खलिफे,कांॅग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हारिस सेखासन,अशोक जाधव,राजिवाडा मच्छिमार सोसायटीचे सदस्य शब्बीर भाटकर,जयहिंद मच्छिमार सोसायटी आयरे,कोकण विभागिय फिशरमन कॅंग्रेसचे मार्तंड नाखवा,कॅग्रेस जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत,निसार दर्वे,निसार बोरकर,करीम नाकवा,कपिल नागवेकर,शकील दाव्त,महिला नेता आश्विनी आगासे,सुश्मिता सुर्वे,रुपाली सावंत आदी उपस्थित होते.


टिप्पण्या