बिजेएस च्या 'धारावी मिशन'च्या संकल्पनेतून धारावीत आरोग्य शिबिरावर भर; रुग्ण संख्या घटली
मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
कोरोनाच्या संसर्गजन्य रोगामुळे मागील एक वर्षांपासून संपूर्ण जगजीवन विस्कळीत झाले आहे.यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. धारावी सारख्या झोपडपट्टी भागात याचा पादुर्भाव वाढू नये. म्हणून मुंबई मनपाच्या ग/उत्तर विभागाच्या सहकार्याने भारतीय जैन संघटनेच्या 'धारावी मिशन' या संकल्पनेतून माझी धारावी, माझी जबाबदारी यास महत्व देत प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर आयोजित करीत आहे. व या माध्यमातून नागरिकांना या आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत धारावीत ६० शिबिरातून १२०२० रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे धारावीत सद्या ४७८ संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. तर रोज जास्तीजास्त सात ते आठ संशयित रुग्ण सापडत आहेत.
त्यामुळे धारावीतील रुग्ण संख्या घटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारतीय जैन संघटना गेली एक महिना प्रचार/प्रसार,पथनाट्य या माध्यमातून जनजागृती करून कोरोनाच्या आजाराची लक्षणे समजून सांगितली जात आहेत.त्याचा परिणाम म्हणून धारावीतील जनतेला जागृत केल्यामुळे या आजारापासून होणारे परिणाम लक्षात घेऊन त्यावरती त्वरित नागरिक उपचार करून घेत आहेत. भारतीय जैन संघटना दिवसातून तीन ते चार ठिकाणी आरोग्य शिबीरे आयोजित करीत असल्याचा दिलासा धारावीतील नागरिकांना मिळत आहे.त्यामुळे स्थानिक आ.वर्षाताई गायकवाड, खा.राहुल शेवाळे,आरोग्य समितीचे उपाध्यक्ष वसंत नकाशे, प्रभाग समिती अध्यक्ष टी एम जगदीश, नगरसेविका हर्षला मोरे, आशिष मोरे, मुंबई मनपाचे अधिकारी तसेच धारावीतील नागरिक भारतीय जैन संघटनेचे कौतुक करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा