शिवराजे प्रतिष्टान आणि मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने नालासोपारा येथे रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
नालासोपारा: दीपक मांडवकर
शिवराजे प्रतिष्टान आणि मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने आज नालासोपारातील साईछाया मंदिर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. लोकांनी उत्स्फुर्तपणे पुढे येत रक्तदान केले.
रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान, रक्तदान हेच जीवनदान मानले जात असताना आताच्या काळात प्रत्येक रुग्णालयात रक्तचा तुटवढा भासत आहे. विविध संस्था रक्तदान शिबिरचे उपक्रम राबवत असून देखील ही रक्तदानाची समस्या दिवसांन दिवस वाढत आहे. अशातच शिवराजे प्रतिष्टान आणि मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले. दर वर्षी विविध सामाजिक व वैद्यकीय मोफत विविध उपचार उपक्रम राबवत असताना सामाजिक बांधिलकी व नागरिकांना आपुलकीचे नाते जोडले जात आहे. या शिबिराने प्रामुख्याने सर्व सभासदांना इछुक नागरिकांनी देखील सहभाग घेतला या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ७ वाजता झाला तर. सायंकाळी ४ वाजे पर्यंत ८५ रक्त दात्यांनी आपले योगदान दिले.
शेवटी शिवराज प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. पूरवांग तांदळेकर तशेच मराठा समाज अध्यक्ष वसई विरार शहर श्री, विश्वास सावंत, मराठा उद्योजक लॉबी पदाधिकारी श्री. कल्पेश सकपाळ यांनी सर्व सर्वकारी व खास रक्त दात्यांचे आभार मानले.
या रक्तदान शिबीराच्या नियोजनास मराठा उद्योग पदाधिकारी तथा समान सेवक- साई छाया विद्यामंदिराचे संस्थापक श्री. डॉ. संजय जाधव यांचे मोठे योगदान लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा