पार्वतीपुत्र अवि-अनिल कलामंच निर्मित शोध नवीन सूर ताऱ्यांचा ऑनलाईन गायन स्पर्धेचे आयोजन....!
प्रतिनिधि : दीपक मांडवकर
कोकण म्हटले डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्गरम्य चालता बोलता स्वर्गच तो, ह्या स्वर्गात देखील स्वप्नवत इंद्रनगरी प्रमाणे अनेक खेळ खेळले जातात. त्यात मग नमन, नाटक, शक्तीतूरा, भजन, कीर्तन,गायन,वादन, इत्यादी अश्या अनेक प्रकारच्या लोककला सादर होऊन,लोकमनोरंजन केलं जातं...!कोकणच्या ह्या स्वर्ग नगरीत असे अनेक लोककलावंत, कलामंच अश्या कला सादर करत असतात. आपल्या दैनंदिन व्यस्त जीवनातून अनेक मंडळी ह्या लोककला सादर करताना आपल्याला नेहमीच दिसतात.त्यातीलच एक प्रसिद्ध कलामंच नेहमीच नवनवीन प्रयोग सादर करत असतो.
पार्वतीपुत्र निर्मित अवि-अनिल कलामंच नेहमीच नवनवीन कलाकारांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देत असतो. आज वैश्विक महामारी कोव्हिड- १९ मुळे सर्व जनता आणि प्रामुख्याने लोककलावंत मंडळी घरात बसलेली आहेत. परंतु नेहमीच रंगमंचावर थिरकनाऱ्या कलाकार मंडळींना त्यांची लोककला कधी स्वस्थ बसू देत नाही, म्हणूनच,पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच आँनलाइन गायन स्पर्धेचे एक अनोखे आयोजन करीत आहे. या स्पर्धेमध्ये कोणीही स्पर्धक सहभागी होऊ शकतो. आपली अंगीलोककला अवि-अनिल कलामंच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोहविण्याचे होणार आहे. तरी ह्या स्पर्धेत देशातील, महाराष्ट्रातील, आणि इतर राज्यातील स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे. स्पर्धा म्हटली कि नियम अटी आल्याचं कि ,तरी ह्या स्पर्धेचे नियम व अटी सुद्धा आम्ही आपल्या पर्यत पोचवत आहोत.१) गाण्याचा कालावधी ३ ते ४ मिनींटांचा असावा व स्पर्धकाला व्हिडिओच्या सुरुवातीला आपले संपूर्ण नावं व स्पर्धक क्रमांक सांगणे अनिवार्य आहे.
२ ) व्हिडिओ स्वीकारण्याची अंतिम तारीख २३/०४/२०२१ असेल. ३ ) व्हिडिओ अविअनिल कलामंच या युट्यूब चॅनेलवर प्रसारित झाल्यावर स्पर्धकांना गाण्याच्या लिंक २४/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ या कालावधीत शेअर करता येतील ४) स्पर्धेचा निकाल ६०टक्के हा स्पर्धकांच्या मिळालेल्या लाइक्स व्हिडिओ अपलोड केल्यापासून ते अंतिम तारीख २४/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ यावर अवलंबून असेल व ४० टक्के निकाल हा परिक्षकांवर अवलंबून असेल ५) स्पर्धा व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचे एडिटिंग चालणार नाही, तसे आढळल्यास तो स्पर्धक बाद करण्यात येईल.
६) स्पर्धेचा अंतिम निकाल आयोजकांतर्फे कळवण्यात येईल व कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करून पारितोषिक व सन्मानपत्र लोककला सेवक संस्था महाराष्ट्र, या संस्थेकडून मुंबईतील संस्थेच्या कार्यक्रमात देण्यात येईल .
ह्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मा.लोकशाहीर श्री.संदीपजी मोरे व रुदाली दळवी हे काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी किंवा आपला सहभाग निश्चित करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.अनिल गराटे -9702137780 अविनाश गराटे -9594947912 गणेश देवकड -8291419643 पवन पाटमसे 917021055014 सुनील लोगडे 919370714166 अंकिता गोणबरे 918928767947 किरण बलकटे 918779671603 प्रिती भोवड - नियोजन प्रमुख - पवन पाटमासे प्रिती भोवड, अंकिता गोणबरे असे असून तरी ही ऑनलाईन स्पर्धा श्री अविनाश गराटे यांच्या मार्गदशांनाखाली पार पडत आहे आपला सहभाग नोंदविण्याकरता खालील लिंकवर क्लिक करून माहीती भरावी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfzVP3Ore-qN_lme_lazfMzdY5voiT9Fghvxsgjdaeh_sgC_g/viewform?usp=sf_link
आपला सर्वांचा ह्याही उपक्रमाला भरभोस प्रतिसाद मिळेल अशी अश्या आयोजक श्री अनिल गटाटे आणि अविनाश गराटे ह्यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा