मुर्तवडे कातळवाडी येथे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन
मुंबई (शांत्ताराम गुडेकर)
चिवळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी येथील श्री तांबे नवतरुण हनुमान भक्त मंडळ,( तांबेवाडी ) मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे होणारा श्री हनुमान जन्मोत्सव यावर्षी देखील साजरा होणार असून दिवसेंदिवस वाढत जाणारा कोव्हिड - १९ ( कोरोना व्हायरस ) चा वाढता प्रादुर्भाव यामुळे या काळातील शासकीय नियमांचे पालन करून अगदी साधेपणात हा उत्सव साजरा करण्याचा मंडळाने निर्धार केला आहे.मंडळातर्फे प्रतिवर्षी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यावेळी मात्र सांस्कृतिक कार्यक्रम न होता अनेक वर्षांची परंपरा मंडळ जपत हा उत्सव दि.२६ व २७ एप्रिल २०२१ रोजी श्री हनुमान मंदिर येथे पार पडणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा