कुटूंबियांची वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
ठाणे (प्रतिनिधी)
: दहा लाखांच्या कर्जाचा गेल्या महिन्यातील केवळ एक हप्ता थकीत राहील्याने फायनान्स
कंपनीने कोरोनाबाधित थकबाकीदाराला फोनवरुन दमदाटी केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला.
याप्रकरणी थकबाकीदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत वर्तकनगर
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या
वतीने करण्यात आली आहे.
लोकमान्य नगर येथील
सिध्दीविनायक पार्क येथील रहीवाशी प्रशांत पांचाळ यांनी मेन्टीफी फायनान्सकडुन कर्ज
घेतले होते. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झालेले पांचाळ त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव
एक ते दोन हप्ते भरू शकले नाहीत. त्यामुळे मेन्टीफी फायनान्समध्ये काम करणार्या वसुली
अधिकारी राज शुक्ला याने पांचाळ यांना वसुलीसाठी फोन केला असता अर्व्वाच्य भाषेत शिवीगाळ
केली. त्यांच्या पत्नीस उचलुन नेण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पांचाळ यांनी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याशी
संपर्क साधला. त्यांनी स्थानिक मनविसे पदाधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. मनविसे
उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण यांनी तत्काळ प्रशांत पांचाळ यांची भेट घेतली. त्यांना धीर
दिला. तसेच या मुजोर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना संपर्क साधून चव्हाण यांनी चांगलेच
धारेवर धरले. याप्रकरणी पांचाळ यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात राज शुक्ला विरोधात तक्रार
दाखल केली आहे.
महाराष्ट्रात मोगलाई
नाही,कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मनसेची मागणी
महाराष्ट्रात मोगलाई नाही की असे कोणाच्याही पत्नीला
उचलून न्यावे. आज मेन्टीफी कंपनीचा कर्मचारी सुरेश हा त्यांच्या घरी आला होता. 'मला राज शुक्ला यांनी पाठवले आहे' असे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र सैनिक तिथे पोहचले व मनसे स्टाईलने समाचार घेतला. भविष्यात या कंपनीचे
कर्मचारी कोणत्याही थराला जावू शकतात. या प्रकरणात गांर्भीर्याने लक्ष घालुन कंपनी
व शुक्लावर फौजदारी कारवाई करावी,असे निवेदन मनविसे
उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण यांनी वर्तकनगर पोलिसांना दिले. यावेळी विभाग सचिव मयूर
तळेकर, विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभागाध्यक्ष सागर
वर्तक, मंदार पाष्टे, शाखाध्यक्ष ऋषिकेश
घुले, कोश मांजरेकर ऋषिकेश सावंत, रोहित परब आदी उपस्थित
होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा