शिवसेनेच्यावतीने उलवे शहरात रविवार २ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पनवेल :- जगात फक्त कोरोनाची लाट नसून सुनामी आली आहे मागील वर्षा पासून विश्वात लाखो लोक आपले प्राण गमवावे लागले आहेत रोज लाखो लोकाना प्रादुर्भाव होत असुन त्याचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे माणूस म्हणून जगत असताना समूहाने जगणे हा त्याचा स्ताईभाव आहे मात्र या साथीने कहर करून मानवाला एकटे पाडले आहे आपल्या कुटुंब व सहकाऱ्यांना अलिप्त केले आहे वाढत्या रुग्ण संख्येमुळे सध्या संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने उरण विधान सभा क्षेत्रात विभागवार रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा प्रमुख तथा मा आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे प्रतिपादन पत्रकारान जवळ बोलताना उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील यांनी सांगितले

     शिबिराचे उद्घाटन मावळ लोकसभा क्षेत्र खासदार श्रीरंग बारणे साहेब करणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्ह्यातील शिवसेना नेते व जिल्हा सल्लागार आदरणीय बबनदादा पाटील तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा प्रमुख तथा मा आमदार मनोहर शेठ भोईर भूषविणार आहेत

     प्रसंगी विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून रायगड जिल्हा शिवसेना संघटक सदानंद राव भोसले पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ शेठ पाटील पनवेल तालुका संघटक मर्फी शेठ क्रीयाडो उप तालुका प्रमुख हनुमान शेठ भोईर विभाग प्रमुख सुनिल पाटील आदी मान्यवरांसह शिबीर यशस्वी करण्यासाठी वहाळ शिवसेना शाखा प्रमुख सुधीर शेठ घरत सेक्टर २० शाखा प्रमुख सुरी गौर ऋषि म्हात्रे शिवाजीराव पालांडे संघटक चंद्रकांत गुजर उद्योजक सुरेश पाटील ज्ञानदेव पोळ व अन्य पदाधिकाऱ्यांसह मान्यवर मेहनत घेत आहेत

टिप्पण्या