सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार तालुका भव्य महारक्तदान शिबिर संपन्न


वसई:-

दिनांक २१/०४/२०२ प्रभू श्रीराम जन्मोत्सवा निमित्त कोरोना काळात खऱ्या अर्थाने वसई-विरार तालुक्यातील नागरिकांनी रक्तदान करून रामनवमी साजरी केली.

सकाळी ०९:०० वा प्रभु श्रीरामचंद्र व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमास सुरवात झाली.या रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोना हा विषाणू नष्ट व्हावा अशी प्रार्थना करून  आणि एक नवीन ऊर्जा  प्राप्त करण्यासाठी प्रभू श्रीराम व शिव छत्रपतींचा जयघोष करून कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला. विषेश आभार सौ.रिटा सारवैया ( विरार पश्चिम नगर सेविका) श्री मंगलमुर्ती मंदिर ट्रस्ट विरार पश्चिम, सरला ब्लड बँक डॉक्टर आणि कर्मचारी, शिव आज्ञा प्रतिष्ठान पालघर 

तसेच नितेश पाटील, आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे, सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार तालुक्यातील सर्व पदाधिकारी दुर्ग सेविका सहभागी होते.



टिप्पण्या