दापोली तालुक्यात 220 किलो गोमांस जप्त,दोघांना अटक

 


रत्नागिरी - दापोली शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोमांस वाहतुक करणारी ओम्नी कार आढळून आली.या गाडीमध्ये तब्बल 220 किलो गोमास होते.या प्रकरणी दोपोली पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.अल्ताफ पेटकर(वय ४८) व जुबेर खलफे (४० रा.मंडणगड) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.याप्रकरणी त्यांना मदत करणाऱ्या मुस्तीद खलीपे व अजमल पेटकर यांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार दापोली पोलीस काल रविवारी रात्री पेट्रोलींग करत असताना त्यांना काळकाई कोंड परिसरात एका मारुती ओम्नी कारमध्ये 220 किलो गोमांस सापडून आले.ही गाडी मंडणगड येथील लाटवण येथून दापोलीमध्ये गोमास घेवून आली होती.यावेळी पोलीसांनी हे गोमांस जप्त करत दोघांना ताब्यात घेतले.

 याप्रकरणी पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 चे कमल ५(ब),(क) ९ व मोटर वाहन कायदा कलम 3/118,130,177,133,194 व भा.दं.वि 429,34,224 प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या करीत आहेत.

टिप्पण्या