रत्नागिरीत WE ग्रुप तर्फे कुर्ली व कसोप समुद्र किनार्यावर स्वच्छता अभियान
रत्नागिरी : We group तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियाया अंतर्गत कुर्ली व कसोप समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली. कोविड -१९ च्या आजारमुळे सर्वांनाच स्वच्छतेचे महत्त्व जास्त समजले असून सर्व तरुणांनी नव्या जोशाने स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
'Pebbles beach' ची नैसर्गिक देणं असलेल्या कसोप समुद्रकिनारी अक्षरशः कपड्यांचे डोंगर वाटावे असे ढीग साचले होते . त्यामुळे जवळ - जवळ ३ तासाच्या अथक प्रयत्नानंतर युवकांनी अभियान पूर्णत्वास नेले. या अभियानात जवळ जवळ ३० पोती कचरा गोळा करण्यात आला व किनारा स्वच्छ करण्यात आला.
भविष्यातही या स्वरूपाची अभियान We ग्रुप तर्फे आयोजित करण्यात येणार असून तेव्हा इच्छुक तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन सदर ग्रुप तर्फे करण्यात आले आहे. .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा