जयेश वेल्हाळ यांना २४ टाईम्स तर्फे युथ आयकॉन पुरस्कारने सन्मानित


मुख्य अतिथी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र पवार यांच्या हस्ते जयेश वेल्हाळ यांचा सन्मान 

मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांना नुकताच २४ टाईम्स तर्फे युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २४ टाईम्स न्यूज अँड एंटरटेनमेंट चे संस्थापक गोविंद गोलार आणि अम्माजी सेवा संस्थेचे अध्यक्ष त्रियोगी पांडे यांनी या कार्यक्रमाचे शिरोडकर हॉल परेल येथे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र पवार यांच्या हस्ते जयेश वेल्हाळ यांना सन्मान चिन्ह पुरस्कर देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये तृतीयपंथी यांच्यासाठी फेशन शो तसेच टेलेंट शो चे देखील आयोजन करण्यात आले होते. तृतीयपंथी कडे बघण्याची नजर बदलायला हवी  तसेच त्यांना सुद्धा त्यांचा आत्मसन्मान मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रस्तरावर सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , कला व क्रीडा क्षेत्रात चौफेर कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या