निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत भडेच्यावतीने विद्यार्थांसाठी संगणक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
लांजा :प्रतिनिधी दिपक मांडवकर
निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत भडेच्या वतीने विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेवून गावाच्या विकासासाठी संगणक मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला.
लांजा तालुक्यातील विविध क्षेत्रात सर्वात पुढे असलेली व रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वतीने निर्मल व तंटामुक्त पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत, कोरोना लढा सन्मान पुरस्कृत ही ग्राम कृती दल तसेच समस्त भडे नागरिकांनी कोरोनाचा अटकाव करण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाच्या आधारावर सद्या ही ग्रामपंचायत लांजा तालुका सह रत्नागिरी जिल्ह्यात अग्रेसर आहे.
महाराष्ट्र शासन पंचायत राज मधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा टप्पा असलेल्या म्हणजे मिनी मंत्रालय ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचा सर्वात मोठा आणि प्रमुख केंद्र बिंदू म्हणजे या भडे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सुधीर तेंडुलकर. उच्चशिक्षीत व्यक्तिमत्व असल्याने निःस्वार्थी वृत्तीने ग्रामपंचायतीचे नाव लांजा तालुका सह रत्नागिरी जिल्यात देखील यांनी आपल्या गावाचा ठसा उमटवला आहे.
या गावातील प्रत्येक विद्यार्थी हा आय एस आय अधिकारी होणारच या ध्येयाने देखील यांची वाटचाल आहे. म्हणूनच विद्यार्थी भविष्य आज उद्या आणि शिक्षणाची माझी जबाबदारी व कर्तव्य, आता नाको भीती इंग्रजीची अश्या, प्रत्येक ग्रामस्थ आणि विद्यार्थी वर्गाला MS-CIT आणि MKCL चे क्लूस देण्याच्या तथा अन्य महत्त्वाच्या मुद्यांना महत्त्व देऊन गुरुवार दिनांक १८ मार्च २०२१ रोजी कोलते कॉम्प्युटर रत्नागिरीच्या सहयोगाने संचाकल श्री.संतोष कोलते, निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत भडे श्री. सुधीर आत्माराम तेंडुलकर, सर्व सदस्य, शा.व्यवस्थापन समिती, अध्यक्ष तंटामुक्त ग्रामपंचायत भडे, सर्व पालक, मुख्याध्यापक व ग्रामस्थ इत्यादीं मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कोलते कॉप्युटर्स रत्नागिरी संचालक श्री. संतोष कोलते यांनी योग्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे प्रत्येक क्षेत्रात गावाचा विकास व्हावा आणि अजून गतिमान प्रगती होईऊन गावातील प्रत्येक नागरिक विकसित होऊन संपूर्ण विकास घडावा असे भडे ग्रामपंचाय सरपंच श्री. सुधीर तेंडुलकर यांनी संबोधित केले.
सरपंच श्री. सुधीर तेंडुलकर, उपसरपंच सौ.सदिच्छा नवाथे, माजी सरपंच संजीवकुमार राऊत, तंटामुक्त समिती अध्यक्ष वासुदेव आग्रे, भडे ग्राम सेवा संघ मुंबई अध्यक्ष दत्ताराम राऊत, माजी पोलीस पाटील भिकाजी भडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वृषाली लोखंडे, सदस्य संजय खर्डे, सुप्रिया गितये, राजेश मयेकर, जयवंती खर्डे, अक्षता चौगुले, ग्रामसेवक स्वाती महाजन, कर्मचारी शांताराम दळवी, गीतानंद बोरकर, आदर्श शाळा भडे नंबर १ मुख्याध्यापक अक्षता रहाटे आणि शिक्षक वृंद यांचे प्रमुख सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा