रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुके जिल्हा स्तरीय नमन संघटन निर्मिती करण्याकामी बैठक संपन्न

 


(प्रतिनिधी: दिपक मांडवकर)

रत्नागिरी जिल्ह्यातील नमन लोककलेचा प्रामुख्याने बाज असणाऱ्या गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आदी तालुक्यातील व मुंबईतील नमनकरी कोकणकर, एकत्र येऊन कोकण नमन लोककला मंच महाराष्ट्र राज्य या मध्यवर्ती नमन संघटनेची  निर्मीती रविवार दि. १४/०३/२०२१ रोजी स्थळ -कालीका कलामंच्या भव्य सभागृहात मिरजोळे पाडावे वाडी येथे अनेक मान्यवर नमन मंडळ प्रतिनिधींच्या उपस्थित व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात करण्यात आली.

बहुरंगी नमन या लोककलेला व लोककलावंत यांना शासन दरबारी अनेक बाबीतून न्याय मिळवून देण्याकामी रत्नागिरी जिल्हास्तरीय संघटनेची गरज होती. सदर बाबतीत मागील एक दोन वर्षां पासून मुंबई तसेच ग्रामीण ठिकाणी तालुका पातळीवर तालुका शाखा बांधनी साठी अनेक बैठका करण्यात आल्या होत्या. संघटन निर्मीती व प्रथम कार्यकारणी निवड सभा आयोजन हे रत्नागिरी तालुका शाखेच्या यजमान पदाखाली अतिशय सुंदर पध्दतीने करण्यात आले होते. शाखेचे सचिव श्री. विश्वनाथ गावडे  यांनी अतिशय सुंदर व समर्पक पध्दतीने स्वागत व सुत्रसंचलन केलं. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी खेर्डी गावचे जुने जाणते नमन लोककलेचे भिष्मपिताम त्याचबरोबर गाडे अभ्यासक श्री. श्रीधर खापरे यांनी भुषविले. प्रथम मान्यवरांच्यावतीने नटेश्वराच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पन करून व दिप प्रज्वलन करून सभेची सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचे शब्द सुमनांनी व पुष्प देऊन यथोचित स्वागत करण्यात आले.  रत्नागिरी शाखेचे सन्माननीय सदस्य श्री.अरूण कळंबटे यांनी महत्त्वपूर्ण प्रास्ताविक केलं. प्रास्ताविकामधे त्यांनी नमन या लोककलेचं जिल्हास्तरीय संघटन व कार्यकारणी निवड करण्यासाठी आपण एकत्र आलो असल्याचे सांगितले. वेळे आभावी सर्वांनाच आपले विचार मांडता आले नाहीत. मात्र लांजा शाखेचे अध्यक्ष मोहन घडशी, गजानन तटकरे, संगमेश्वर शाखेचे श्री. प्रवीण टक्के, श्री युत्सुयु आर्ते, श्री. प्रदिप (पिंट्या) भालेकर, श्री. नितीन बांडागळे, चिपळूण शाखेचे भिकाजी भुवड, भाई कुळे, रत्नागिरी शाखेचे.  होरंबे, श्री. पि. टी. कांबळे, राजापूर शाखेचे श्री. पर्शुराम मासये, श्री. अशोक डोंगरकर, गुहागर शाखेचे  श्री. जगन्नाथ शिंदे व शर्ती प्रमोद घुमे यांनी आपले अतिशय समर्पक विचार मांडले. त्यांनी आपल्या मनोगतातून नमन लोककलेची संघटना होणं गरजेच होतं सांगितले. त्याच बरोबर नमन लोककलेचा प्रचार व प्रसार होऊन या कलेतील उपेक्षित लोकलावंतांना व लोककलेला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकामी इथून पुढे संघटना सांघिक प्रमत्न करेल असे विचार मांडले. आता पर्यंतची उपेक्षा विचारात घेता या लोककलेला शासन दरबारी लोककलेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी त्याच बरोबर राजाश्रय मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटीत होऊन तालुका संघटना मजबूत करण्यास कटीबध्द असल्याचे सांगितले. 

त्याच बरोबर सभागृहातून सुध्दा काही सभासदांनी संघटनेच्या सभेचं कामकाज अतिशय सुलभ करण्याकामी महत्त्वपूर्ण विचार मांडून योगदान दिलं. सर्वच मान्यवरांच्या सकारात्मक विचारधारेतून एकच भुमीका पुढे आली ती म्हणजे आपल्या नमन या लोककलेला जर शासन दरबारी न्याय मिळवायचा असेल तर जिल्हास्तरीय संघटने शिवाय पर्याय नाही. सदर सभेचा महत्त्वपूर्ण कार्यकारणी निवडीचा विषय सर्व तालुक्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकारी सदस्यांन मधून कोरकमीटी तयार करण्यात आली व कोरकमीटीच्या सर्वसमावेशक चर्चेतून सुचक अनुमोदन पध्दतीने कार्यकारणी निवड झाली. अध्यक्ष - श्री प्रभाकर तानाजी कांबळे ( रत्नागिरी ) उपाध्यक्ष -श्री मोहण गोविंद घडशी ( लांजा ) उपाध्यक्ष -  श्री युत्सुसू आर्ते ( संगमेश्वर ) सरचिटणीस - श्री रवींद्र बा. मटकर ( मुंबई ) सहचिटणीस -  श्री संतोष ह. कुळे ( चिपळूण )

खजिनदार - श्री सुधाकर मास्कर ( गुहागर ) सदस्य श्री. शाहिद खेरटकर  ( मुंबई) श्री. झराजी विर  ( मुंबई ) श्री.  परशुराम मासये ( राजापूर ) श्री. अशोक डोंगरकर( राजापूर ) श्री. विजय मांडवकर ( राजापूर ) श्री. चंद्रकांत पालकर ( लांजा ) श्री. गजानन तटकरे ( लांजा ) श्री. प्रदिप भालेकर ( संगमेश्वर ) श्री. नितीन बांडागळे ( संगमेश्वर ) श्री. कृष्णा जोगले ( संगमेश्वर ) श्री. विश्वनाथ गावडे ( रत्नागिरी ) श्री. विलास भातडे ( रत्नागिरी ) श्री. सुरेश दसम   ( रत्नागिरी ) श्री. भिकाजी भुवड ( चिपळूण ) श्री. सुनील बळकटे ( चिपळूण ) श्री. जगन्नाथ शिंदे  ( गुहागर ) श्री. प्रमोद घुमे    ( गुहागर ) शेवटी नवं निर्वाचित अध्यक्ष श्री. प्रभाकर (पि.टी.) कांबळे यांनी नमन या लोककलेचं जिल्हास्तरीय एकच संघटन का हवं होतं ते सांगितलं व त्यानुसार सर्व तालुका शाखा या  मध्यवर्ती संघटनेचे निर्बंध पाळत  व मध्यवर्ती संस्थेशी प्रामाणीक रहून संघटनेचं कामकाज करतील असं सांगितलं. आता आपली वाटचाल आज पासूनच आपण चालू करत आहोत. नमन लोककलेच्या संदर्भात कोरोणा - १९ च्या या वाईट काळात नमन लोककलावंतांची होत असलेली कर्यक्रम करताना पिळवणूक कुठे तरी थांबवावी यासाठी मंत्री महोदय मा. श्री. उदयजी सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री याची गाऱ्हाणं निवेदनाच्या माध्यमातून त्याच्याकडे मांडण्यासाठी  घ्यायची असल्याचं आवाहन केलं. नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपल्या भाषणातून आपल्या नेतृत्वाची शाप सोडली. उपाध्यक्ष मोहण घडशी यांनी आपल्याला संघटनेची वाटचाल करत असताना ती सर्व तालुका अध्यक्षांना सुध्दा मध्यवर्ती कार्यकारणी प्रमाणे विचारात घेऊन वाटचाल करावी. त्यामुळे शाखा कायम आपल्या मध्यवर्ती संघटनेच्या विचार प्रवाहा मधे राहतील असे सुचवीत केलं. संघटनेच्या कामकाजाला अपेक्षीत गती आणन्यासाठी कार्यकारणी शिवाय सुध्दा काही अनुभवी सभासद आहेत त्यांची सुध्दा मदत योग्य योग्य वेळी योग्य प्रकरणी कार्यकारणी घेत जाईल. लवकरात लवकर पुढील कार्यवाही साठी कार्यकारणी एकत्र येऊन योग्य ते निर्णय घेईल.  रवींद्र मटकर सरचिटणीस आपण आता संघटीत झालो आहोत. आपल्यावर  समस्त तालुका संघटनांनी विश्वास दाखवत आपणास मध्यवर्ती कार्यकारणी व पदाधिकारी  म्हणून अधिकार दिले आहेत. तेव्हा आपण आपली कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी दिलेल्या विश्वाची कुठेही गल्लत न होऊ देता कामकाज करणार आहोत. सभा अध्यक्ष सन्माननीय श्री श्रीधर खापरे साहेब  संघटीत झालो आहोत. आता लढण्याची ताकत ठेवून आपल्या लोककलेला व लोककलावंतांना शासन दरबारी न्याय मिळवून दिल्या शिवाय थांबायचं नाही असं ठासून सांगितलं. आपण सर्वांनी कटीबध्द  होऊन मनाशी पक्का ठाम निर्धार करून एकमेकांचा आदर करत व सुसंवाद साधत प्रत्यक्ष भेटून वा फोनवर चर्चा करून संघटन बांधनीचं कामकाज प्रामाणिकपणे पुढे घेऊन जायचे संबोधित केले.

आपल्या संभाषणात सर्व विषयांना स्पर्श करत त्यांनी मार्गदर्शन केलं. अध्यक्षीय भाषण अतिशय सुचक मात्र  मार्मीक आणि अतिशय समर्पक असे सर्व विषयांना स्पर्श करणारे ठरले. 

सरते शेवटी रत्नागिरी शाखेचे सन्माननीय कार्यकारणी सदस्य श्री. विलास भातडे यांनी आभार प्रदर्शन करून अध्यक्षांच्यावतीने सभा संपविल्याच जाहीर केलं.

टिप्पण्या