शाहिर भिकाजी भुवड दिग्दर्शित आई जीवदानी कलाफाउंडेशन मुंबई च्या वतीने दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रंगणार कोकणची लोककला कोकणचे खेळे - बहुरंगी नमन
प्रतिनिधी: दिपक मांडवकर
शाहिर भिकाजी भुवड निर्मित आई जीवदानी कलाफाउंडेशन मुंबई या लोकप्रिय बहुरंगी नमनाचा या मोसमातील प्रथम शुभारंभ प्रयोग. कोकण म्हणजे नररत्नांची खाण आणि पारंपरिक लोककलेची शान, कोकणातील अनेक लोककला काळानुसार लोप पावत चालल्या आहेत. त्यातील काही लोककला फक्त सणासुदीपुरत्याच मर्यादित न ठेवता त्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिक समतोल साधून त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, व्यावसायिक झाल्या पाहिजेत, कोकणातील कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठीच कोकणातील बरेच लोककलाकार आप-आपल्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत.
कोकणातील लोककला सर्वांना ज्ञात राहाव्यात यासाठीच आई जीवदानी कलाफाउंडेशन मुंबई विविध कार्यक्रमाचे आयोजन करताना सर्व मायबाप रसिक या कलामंचला प्रथम प्राधान्य देतात. नमन, जाखडी-नृत्य अर्थात शक्तीतुरा, भारूड, नाटक या सारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कोकणातील पारंपारिक संस्कृती नवीन पिढीला आपल्या कुटुंबसमवेत पाहवयास यावे, यासाठी या हे कलामंच अग्रेसर आहेत.
नमन म्हटलं कि, त्यामध्ये पुरुषच पूर्वी स्त्री-पात्र साकारत असत. परंतु स्त्री-सुद्धा अभिनय करून रसिक प्रेक्षकांची मने जिकंतात हे या आधुनिक युगात तरुणींनी दाखवून दिले आहे. गतवर्षात स्त्री-पात्रासहित नमन प्रयोग आयोजन करत प्रत्येक मंच 'हाऊसफुल्ल' कार्यक्रम करून दाखवले आहे.
म्हणूनच पुन्हा एकदा सध्याचं जगावर असणारं भयंकर संकट म्हणजे कोव्हिड - १९ या काळातही केवळ कलाकार व रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आई जीवदानी कलाफाउंडेशन मुंबईच्या वतीने आयोजित केले आहे. कार्यक्रम उद्या मंगळवारी दि.२३ मार्च २०२१ रोजी, रात्रौ ठीक ०८.३० वा.मा.दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विलेपार्ले - पूर्व ( मुंबई )येथे आयोजित केला आहे. रसिक प्रेक्षकांना कोव्हिड - १९ च्या दिवसांतील शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तरी कोकणातील ही लोककला पहाण्यासाठी व कलाकारांना माय बाप रसिक प्रेक्षकांनी आशिर्वाद देण्यासाठी उपस्थिती दाखवावी असे आवाहन दिग्दर्शक शाहीर भिकाजी भुवड यांनी केले आहे. तिकिटा साठी संपर्क : शाहीर श्री.भिकाजी भुवड ९०२९३६६४५१, श्री. सूर्यकांत सांडये ८७७९६६२७७१, श्री. देवेंद्र दुर्गवली ८६९१८००७६१
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा