भडे ग्रामपंचायतीच्यावतीने शिमगोत्सवातील खेळे मंडळींना केले सँनिटाइझर आणि मास्कचे वाटप

 


लांजा:  दिपक मांडवकर

         कोकणातील शिमगा, होळी सणाला जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे नियम पाळून  परवानगी दिली असली तरी प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशावेळी शिमगोत्सव साजरा करणाऱ्या खेळेमंडळींना आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी  तालुक्यात अग्रेसर असलेली निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत भडेने सँनिटाइझर आणि मास्कचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 यापुर्वीही या ग्रामपंचायतीने कोरोना काळात ग्रामस्थ व मुंबईकर मंडळींची विशिष्ट काळजी घेऊन सर्व नियोजित व्यवस्था केली होती. आज गावातील शिमगा सणाला सुरवात झाली त्या वेळी जिल्हाधिकारी व शासन नियम पाळून ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री. सुधीर तेंडुलकर, तंटामुक्त अध्यक्ष श्री. वासुदेव आगरे आणि ग्रामपंचाय सदस्य यांच्या उपस्थितीत प्रत्येक शिमगा सणाला तयार झालेल्या नागरिकांना व मानकरी मंडळींना प्रत्येकी मस्क व सॅनिटाइझर वाटप करण्यात आले. व सर्वांनी काळजी घेऊन हा उत्सव साजरा करण्याची विनंती केली.

टिप्पण्या