कवडीमोल किंमतीत विक्री केलेल्या नाणारच्या जमीनी एजंटांनी शेतकऱ्यांना परत कराव्यात – श्री जगदिश जुलूम
लांजा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. मानसी आंबेकर यांचे अभिनंदन करताना शिवसेना लांजा तालुका संपर्क प्रमुख जगदीश जुलूम सोबत रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे सह संपर्क प्रमुख भाई विचारे, उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर, लांजा तालुका प्रमुख संदीप दळवी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मंचेकर आदी दिसत आहेत.
लांजा (प्रतिनिधी) नाणार
रिफायनरी प्रकल्प हा मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राजापूर
मधून हद्दपार केल्याचे जाहीर केले असून ज्या दलाल व एंजट यांनी मूळ जमीन मालकांकडून कवडीमोल किंमतीत जमिनी घेऊन भरमसाठ किंमतीत विकून नफा मिळविला आहे त्या सर्व
जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात अशी आग्रही मागणी शिवसेनेचे लांजा तालुका संपर्कप्रमुख
जगदीश जुलूम यांनी केली असून यासाठी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच
शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिधुदुर्गचे पालकमंत्री
उदयजी सामंत यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती जगदीश जुलूम यांनी दिली आहे.
कोकणात
मोठ्या प्रमाणात आंबा, फणस, काजू जांभूळ, कोकम आदी पिके मोठ्या प्रमाणात येत असून या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग आणून
येथे रोजगार निर्माण करण्याऐवजी अणुऊर्जा तसेच रिफायनरी सारखे प्रकल्प आणून कोकण भकास
करण्याचा प्रयत्न भाजपाचा होता व आहे मात्र सत्तेपेक्षा स्थानिक जनतेचे हित म्हह्त्वाचे
असून कोणत्याही दबावाला भिक न घालता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हा रिफायनरी प्रकल्प
राजापूर मधून हद्दपार केल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहेत. स्थानिक जनता
व मूळ शेतकरी यांना हा प्रकल्प नको असताना देखील काही दलाल व राजकीय पुढारी रोजगाराच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करीत आहेत
व या प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत त्यातून आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा प्रयत्न
आहे अशा पुढाऱ्यांना स्थानिक जनतेने त्यांची जागा दाखवून दिली असून सर्व जनता ही शिवसेनेसोबत
आहे त्यामुळे हा प्रकल्प कदापी येथे होणार नाही मात्र स्थानिक जनतेला फसवून कवडीमोल
किंमतीला घेतलेल्या जमीनी मूळमालकांना परत कराव्यात यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रयत्न
करण्यात येत असून जनतेच्या हितासाठी या आंदोलनात सर्व जनतेने सहभागी होण्याचे आवाहन
शिवसेनेचे लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा