विक्रोळी येथील शुश्रूषाचे सुमन रमेश तुलसियानी हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरु


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

शुश्रूषा सुमन रमेश तुलसियानी हॉस्पिटल, विक्रोळी येथे कोवॅक्सिन कोविड वॅक्सिनेशन सुविधा सुरु करण्यात आली आहे.  शुश्रूषा हॉस्पिटलचे ज्येष्ठ डॉक्टर ज्यांनी ४० वर्षे विक्रोळी येथील याच वास्तूतील  शुश्रूषा हॉस्पिटलचे ' बाळंतपण व लहान मुलांचे हॉस्पिटल ' यशस्वीरित्या सांभाळले ते डॉ. अविनाश म्हात्रे यांच्या शुभहस्ते फीत कापून लसीकरण केंद्राचे उदघाटन  करण्यात आले. यावेळी डॉ.सौ. सुला अविनाश म्हात्रे, चेअरमन सौ. वैशाली धोटे, डीन डॉ. सचिन मंडलिक, संचालक रमेश धामणकर, सुरेश सरनोबत आणि कृष्णा काजरोळकर उपस्थित होते. तसेच विक्रोळीवासियांसाठी  कोरोना काळातही अविरत सेवा देणारे कोरोना योद्धा सुपरिचित डॉ. हरिष पांचाळ उपस्थित होते.

उदघाटनप्रसंगी लसीकरणाचा पहिला मान डॉ. अविनाश म्हात्रे, डॉ. सुला अ. म्हात्रे, शिक्षण महर्षी अस्मिता कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नार्वेकर आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी विक्रोळी केंद्राच्या प्रमुख निलीमा दीदी यांना देण्यात  आला. हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राचे  नियोजन अप्रतिम व शिस्तबद्ध असल्याचे जाणवत होते. पहिल्याच दिवशी १९० नागरिकांनी लाभ घेतला. प्रत्येक लाभार्थिने या उत्कृष्ठ नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना विक्रोळी परिसरातील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.

हॉस्पिटलचे अँडमिनिस्ट्रेटीव मॅनेजर श्री. निरंजन यमजाल, मेडिकल सुपरिंटेंडंट डॉ. कमलेश जोशी, पीआरओ आसावरी पारकर व त्यांचे सहकारी, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आदीनी उत्कृष्ठ नियोजनासाठी परिश्रम घेतल्याबद्दल हॉस्पिटलच्या चेअरमन, डीन व संचालक यांनी त्यांचे अभिनंदन केले.प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. या केंद्रात सकाळी ९ ते सायं. ४.३० (रविवार व सुट्टीचे दिवस सोडून) सेवा उपलब्ध आहे. येतेवेळी आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन येणे. शुल्क रु. २५०/- फक्त. ज्यांनी अँपद्वारे रजिस्ट्रेशन केले नसेल त्यांचे करुन दिले जाईल असे यावेळी  केंद्रातर्फे सांगण्यात आले.

टिप्पण्या