दीप शाल बिल्डिंग ते हिंदुहृदयसम्राट मा.स्व.बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत रस्त्याला स्वर्गीय दामोदर नारायण माळी यांचे नाव देण्यासाठी पहाणी

 


महानगरपालिकेत तात्काळ प्रस्ताव सादर;शाखाप्रमुख  सुनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

मुंबई(शांत्ताराम गुडेकर/ समीर खाडिलकर) 

       "बोले  तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले " असे कायमस्वरुपी म्हटले जाते.याचे बोलके उदाहरण म्हणजे बोरीवली पश्चिम येथील शाखाप्रमुख सुनील काशिनाथ पाटील ( शिवसेना शाखा क्र.१७)यांच्या रुपात बघायला मिळते. शाखाप्रमुख सुनिल पाटील यांनी स्वर्गीय दामोदर ना. पाटील यांचे आकस्मित निधन झाल्यापासून दामोदर पाटील यांचे स्मारक व्हावे अशी मनोमन इच्छा होती. आज ती खऱ्या अर्थाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहेत. आजपर्यंत स्थानिक लोकांची नावे आपल्या विभागातील रस्त्याना मिळावीत यासाठी सातत्याने प्रयत्न केले व त्याला यशही आलेले आहे.उदा. कै.अनंत केरु पाटील मार्ग व कै. लक्ष्मण पांडुरंग भंडारी मांर्ग ही शिंपोली गावातील समाज सुधारकांची व भूमिपुत्रांची नावे देण्यात आली आहेत. सुनिल पाटील यांनी आज दीप शाल बिल्डिंग ते हिंदुहृदयसम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत रस्त्याला स्वर्गीय दामोदर नारायण माळी यांचे नाव देण्यासाठी पहाणी केली.यावेळी स्थानिक नगरसेविका बीना बेन दोशी,उपशाखाप्रमुख मनोज घडशी, समाज सेवक करण भदर्गे, संदीप (परब) उपस्थित होते.विशेष म्हणजे हा प्रस्ताव महानगरपालिकेत तात्काळ सादर करण्यातही आला अशी माहिती ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप सावंत यांनी दिली. शाखाप्रमुख सुनिल पाटील आपण शिंपोली गावाचे सुपुत्र खऱ्या अर्थाने शोभता.एका नगरसेवकांचे काम आपण करीत आहात.तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडे. आम्हाला  आपला अभिमान आहे अशा प्रतिक्रिया यानिमिताने स्थानिक रहिवाश्यांकडून देण्यात आल्या.श्री. प्रवीण शाह व श्रीमती बिनाबेन दोषी व संपूर्ण आर मध्य विभागीय नगरसेविका/नगरसेवकांचे श्री शिंपोली ग्रामस्थ मंडळ, शिंपोली, बोरिवली (प.) तर्फे आभारही व्यक्त करण्यात आले. श्री. पंढरीनाथ भंडारी अध्यक्ष व श्री. कुमार भंडारी सचिव व  सुरेश लाड सदस्य यांनी शाखाप्रमुख व नगरसेविका/नगरसेवक यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस यानिमिताने शुभेच्छा दिल्या.गेल्या दोन वर्षापासून करत असलेल्या प्रयत्नांना यश लाभल्याने अनेकांना धन्यवादही दिले.

टिप्पण्या