ह्युमन राईट्स असोशिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी डाॅ.पी.जी पवार यांची नियुक्ती

 

ठाणे ( प्रतिनिधी ) ह्युमन राईट्स असोशिएशन फार प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी ठाण्यातील थोर समाजसेवक,डाॅक्टर श्री पी.जी.पवार यांची नियुक्ती झाली असून त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 डाॅक्टर श्री पी.जी.पवार गेली अनेक क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे.त्यांचा बराचसा वेळ रुग्णांची सेवा करण्यात गेला असून ग्रामीण भागातील गरीब जनतेसाठी त्यांनी अनेक वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.त्यामुळे या सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानामुळे त्यांनी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

  नुकतीच त्यांची ह्युमन राईट्स असोशिएशन फार प्रोटेक्शनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री प्रमोद केसरकर यांनी महाराष्ट्रात संघटनेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.पी.जी पवार यांच्या निवडीमुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या