स्वराज्य प्रतिष्ठान लांजा ठरला रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला राष्ट्रीय कला गौरव पुरस्काराचा २०२१ चा मानकरी

 



रत्नागिरी:  दिपक मांडवकर

       रत्नागिरी जिल्ह्यातील  तरुणांचे प्रेरणा स्थान आणि स्वराज्य प्रतिष्ठान लांजा चे संस्थापक श्री. ऋषिनाथ पत्याणे यांच्या स्वराज्य प्रतिष्ठानला बुलढाणा फिल्म असोसिएशन  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार २०२१ जाहीर केला.

जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपल्या सेवेच्या माध्यमातून वृद्धाश्रम, अनाथाश्रम, विद्यार्थी मार्ग दर्शन शिबीर असे अनेक उपक्रम राबवत गोरगरीब जनतेची सेवा, हीच ईश्वर सेवा ध्येय श्री. ऋषिनाथ पत्याने  यानी उराशी बाळगले आहे. कोरोना  काळामध्ये आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या वाटप, पोलिसांसाठी विविध उपक्रम, मास्क वाटप, गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्य किराणा वाटप असे उपक्रम अनेक सेवेंच्या माध्यमातून जनसेवा केली. या सेवेमुळे अनेक लहान थोर माणसे स्वराज्य प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला जोडली गेली आहेत. आपल्या सेवेला कोणताही राजकीय रंग न देता फक्त सेवा आणि सेवा हे स्वप्न उराशी बाळगुण अनेक ठिकाणी अनेकांच्या उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला. परंतु प्रसिद्धीपासून लांब असणार हे व्यक्तिमत्त्व आणि याच सर्वाची दखल घेत बुलढाणा फिल्म असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. ऋषिनाथ पत्याणे यांची राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार २०२१ साठी निवड केली आहे. आणि या निवडीमुळे स्वराज्य प्रतिष्ठान परीवारामध्ये आणि जिल्ह्यातील तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. व संपुर्ण लांजा तालुक्यात देखील शुभेच्छा वर्षाव होत आहे. तर मी केलेल्या निःस्वार्थी कार्याचे प्रतीक म्हणून या पुरस्काराने मी समाधानी आहे. व अशी सेवा माझ्या कडून जन्मोजन्मी घडत राहतो अशी ईश्वरचणी पार्थाना करतो. आणि बुलढाणा फिल्म असोसिएशनचे  जाहीर आभार मानतो असे मनोगत स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. ऋषिनाथ पत्याणे यांनी वेक्त केले.

टिप्पण्या