ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे ,तुमच्यासाठी नव्हे रे आमच्यासाठी असा सामाजिक संदेश देत युवाध्यक्ष विशाल मोरे यांच्या कन्येचा अनोखा वाढदिवस साजरा

 


ठाणे : प्रतिनिधी

   बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार असणारा ओबीसी समाज गेली नव्वद दशके संविधानिक न्याय, हक्क, अधिकारांपासून कायम दूर राहिला आहे. समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न,आरक्षण,जातीनिहाय जनगणना,जैसे थे आहेत.

कोकणातील तालुका दापोली दाभीळ मोरेवाडीचे सुपूत्र,कुणबी युवक मंडळ १८ गाव उन्हवरे विभागाचे युवाध्यक्ष, ओबीसी संघर्ष समन्वय समिती कोकण विभाग दापोली तालुका संपर्क प्रमुख प्रबोधनवादी युवा अध्यक्ष विशाल मोरे यांची कन्या कु. समृद्धी विशाल मोरे हिचा रविवार दि.२१ मार्च २०२१ रोजी दिवा ठाणे येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. 

वाढदिवस म्हटला कि विविध खर्चिक पार्ट्या, डेकोरेशन, साऊंड, डिजे, फटाके,पाहुणे हे सारे अपेक्षित असते. विविध सामाजिक प्रलंबित प्रश्नांची जाणीव असणारे,स्वतः या विविध प्रश्नांबाबत सातत्याने जन आंदोलनात, मोर्चात,चळवळीत लढणारे डँशिंग सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल मोरे यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त ओबीसींच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच होऊ घातलेल्या जातीनिहाय जनगननेबाबत वाढदिवसाला जमलेल्या छोट्या चिमुकल्यांनी " ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे,आमचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेच पाहिजे,ओबीसी बांधवांनी या हक्क अधिकाराच्या संविधानिक लढ्यात सहभागी झालेच पाहिजे तुमच्यासाठी नव्हे रे ,बाबा आमच्यासाठी अशी घोषणा देत केक कापून एक वाढदिवस साजरा झाला.

या अनोख्या वाढदिवसाच्या नव्या संकल्पाचे सामाजिक स्तरावर विशेष कौतुक होत आहे.

टिप्पण्या