राजू बांद्रे आयोजित स्वराज चषक भव्य क्रिकेट स्पर्धेची सांगता
विरार : दीपक मांडवकर
विरार येथे सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरी मैदानावावर राजू बांद्रे आयोजित स्वराज चषक पर्व दुसरे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आजोजन करण्यात आले होते. सुरवातीला मान्यवर श्री. अतुल भाऊ पाखरे (शिवसेना व्यापारी संघटना शाखाप्रमुख शाखा क्रमांक ३६ मालाड पूर्व) यांच्या हस्ते सामन्याचा शुभारंभ करून तब्बल २४ संघ सहभागी झाले होते. त्यात प्रथम विजेते म्हणून मुर्बादेवी क्रिकेट संघ बोंडीवली, दापोली द्वितीय क्रमांक म्हालोर, मुरुड तर तृतीय क्रमांक RK स्पोर्ट्स, मालाड यांनी पटकावला.
उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलदांज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट सामनावीर असे अनेक खेळाडूंना मानचिन्ह देण्यात आले. तसेच अनेक खेळांडूनी उत्तुंग खेळ केला. यांसह आयोजन समिती राजू बांद्रे, भावेश शेगडे, भावेश जागडे, स्वप्नील कवडे, स्वप्नील तरळ, ओंकार व अन्य सहकारी मंडळींनी उत्कृष्ट नियोजनबद्ध आणि कोवीड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत ही स्पर्धा यशस्वी पार पाडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा