घाटकोपर एन वार्ड पालिका कार्यालयावर २३ मार्च रोजी रहिवाशांचा 'टमरेल मोर्चा' शौचालय खुले करुन, बालवाडी बांधून देण्याची मागणी


 मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

    बृहन्मुंबई  महानगरपालिकेच्या एन वार्डच्या अधिपत्यात येणाऱ्या  घाटकोपर पश्चिम येथील भीमनगर येथे महापालिकेच्या विशेष निधीतून दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले 'पे अँड युज' तत्त्वावरील शौचालय लोकांना खुले करावे  तसेच ते बांधताना लोकांना तात्पुरता पर्याय म्हणून बालवाडी तोडून त्या ठिकाणी शौचालय बांधलेल्या जागेवर पुन्हा बालवाडी बांधावी म्हणून पालिकेच्या घाटकोपर एन विभाग कार्यालयावर  २३ मार्च रोजी रहिवाशी 'टमरेल मोर्चा' काढणार आहेत.            येथील नागरिकांसाठी पालिकेच्या विशेष निधीतून स्थानिक नगरसेवक तुकाराम (सुरेश)  पाटील यांच्या प्रयत्नातून हे शौचालय बांधण्यात आले होते. त्यावेळी लोकांना पर्याय म्हणून बाजूची बालवाडी तोडून त्या जागी तात्पुरते शौचालय बांधण्यात आले होते. मात्र आता या ' पे अँड युज' तत्वावर बांधण्यात आलेल्या शौचालयाचे काम पूर्ण होऊन सहा महिने उलटले तरी त्याचे उदघाटन झालेले नाही. त्यामुळे येथील रहिवाशांची कुचंबणा होत आहे. यामुळे स्थानिक भीमनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने राज डोळस, रोशन परदेशी, अनिल जाधव, सुरेखा उबाळे, दीपा परदेशी, मंगल सोनवणे आदीनी याबाबत पालिका आणि स्थानिक नगरसेवक पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. याबाबत चिराग नगर पोलीस ठाण्यात पाटील, रहिवाशी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगरकर यांच्यात बैठकही घेण्यात आली होती. त्यात पाटील यांनी ८ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर रहिवाशांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

"या शौचालयाचे  काम पूर्ण झाले आहे. पाणी आणण्याचे काम सुरू असून, वीज मिटरचेही काम येत्या एक दोन दिवसांत होईल. पाण्याच्या मिटरचे पैसेही भरण्यात आले आहेत." मोठे योगदान देखील तुकाराम (सुरेश)पाटील  स्थानिक नगरसेवक यांचे लाभले. 

टिप्पण्या