जोगेश्वरीतील सामाजिक कार्यकर्त्यानी केली हातावर पोट असणाऱ्या कुटूंबीयांना मदत


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

             जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते अजित वैद्य,प्रभा सोलंकी मॅडम,तिलोत्तमा मॅडम व गार्गी हिरवे यांनी नुकतीच गोर-गरीब,वंचित व हातावर पोट असणाऱ्या जवळपास पत्तीस कुटुंबियांना किराणा सामान (तांदूळ, डाळ, गहू, साखर, पोहे, रवा, कोलगेट, साबण, तेल व मास्क ) देऊन मदत केली.लॉकडाउन मध्ये सर्वसामान्य बरोबर रोजंदारीवर काम करणाऱ्यांची कुटुंब उध्वस्त झाली व अनेकांवर उपासमारीची वेळ आली,आज जवळजवळ वर्ष होत आहे व अजूनही अनेकजण हलाखीचे जीवन जगत आहेत व अशाच काही कुटुंबाना थोडासा आधार मिळावा म्हणून या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पदरमोड करून एकत्र येत ही मदत केल्याचे जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी सांगितले. याआधीही अनेकांच्या सहकार्यातून लॉकडाउन ते आजही अनलॉक पर्यंत जवळपास चार हजाराहून अधिक वंचित कुटुंबियांना किराणा सामान व इतर जीवनावश्यक वस्तू व आरोग्य किट पोहचविण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे हिरवे यांनी सांगितले. 

टिप्पण्या