कुणबी समाज विकास संघ (रजि) मुलुंड संस्थेला आदर्श सामाजिक संस्था गौरव पुरस्कार
मुंबई l दिपक मांडवकर
राजे श्री शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा या सामाजिक संस्थेच्या वतीने सन २०२०- २०२१ यावर्षीचा बहुमानाचा आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार २०२१ मुलुंड मधील कुणबी समाज विकास संघ रजि या बहुचर्चित सामाजिक संस्थेला प्राप्त झाला आहे.
शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी राजेश्री शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्त साधून टिटवाळा येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मान पत्रक व सन्मान चिन्ह देऊन संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष श्री विनायक घाणेकर, श्री अनंत कदम, श्री पांडुरंग गावडे, श्री शंकर बाईत तसेच जेष्ठ महिला संघटक सौ उर्मिलाताई पाटील महिला अध्यक्ष सौ करुणाताई गावडे यांना सन्मानित करण्यात आले.
कुणबी समाज विकास संघ (रजि.)मुलुंड, संस्थेच्या वतीने प्रमुख सल्लागार व माजी अध्यक्ष सन्मानीय श्री उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मुलुंड विभागात सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये शासनाच्या सूचनेनुसार व राज्यात रक्तपेढी मध्ये होणाऱ्या रक्ताचा तुटवडा व रक्ताची गरज लक्ष्यात घेऊन व कोरोनाच्या काळात सुद्धा या अनेक वेळा रक्तदान शिबीर आयोजित करून गरजेच्या वेळी गरजुंना संस्थेच्या वतीने विनामूल्य रक्त उपलब्ध केले कोरोना लोकडाऊन मध्ये विनामूल्य धान्य वाटप करून समाज कार्यात मोलाचे सहकार्य केलेलं आहे .
सदर पुरस्कार वितरण भव्य समारंभात मंडळाचे सर्व जेष्ठ कार्यकर्ते युवा/ युवती कार्यकर्ते तसेच महिला मंडळ कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलुंड पंचक्रोशीततून संघटनेचा अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजात संघटनेची जबाबदारी अजून कितीतरी पटीने वाढली आहे असे संघटनेचे अध्यक्ष सन्मानीय विनायक घाणेकर आनंद व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा