समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील गवाणे येथे गरजू विद्यार्थी आणि शाळेसाठी केली भरघोस शैक्षणिक मदत
लांजा l दिपक मांडवकर
तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गवाणे गावाचे नागरिक श्री चंद्रकांत करंबेळे यांच्या परोपकाराला तोड नाही. त्यांनी आपल्या खेड्यातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षित झाला पाहीजे अशी भावना मनात ठेवून मुले द्त्तक घेण्याबरोबरच शाळांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे लांजा तालुक्यातून कौतूक करण्यात येत आहे.
लांजा तालुक्यातील गवाणे गावातील समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे हे मुंबई उच्च न्यायालय इथे सेवेत असून ते नेहमीच सामाजिक - शैक्षणिक कार्यात अग्रेसर असतात. श्री. चंद्रकांत करंबळे हे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजाचे सहसचिव असून ते ईत्तर विविध सामाजिक - शैक्षणिक संस्था मध्ये कार्यरत आहेत. आपल्या गावाकडील खेड्यातील गरीब - गरजू विद्यार्थी हे कोणत्याही परिस्थितीत शिक्षण वा आवश्यक शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये या साठी ते सतत प्रयत्नशील असतात. अतिशय निरपेक्ष आणि समर्पित भावनेने ते शैक्षणिक कार्य करत असतात. या कार्यात त्यांच्या कार्यालयातील उच्च अधिकारी, वकील, त्यांचे सहकारी तसेच गवाणे शाळा मुख्याध्यापक आणि वकील दिलीप चव्हाण यांचे सहकार्य वेळोवेळी मिळत असते.
श्री.चंद्रकांत करंबळे यांच्या माध्यमातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे नं.१ मधील लाभार्थी विद्यार्थी वगळता गरजू ५५ मुलांना शालेय गणवेश वाटप केले. तर विविध शालेय स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना चित्रकला वही, कंपास, डिक्शनरी चे वाटप केले. तसेच तीन वर्गखोल्या डिजिटल प्रिंट केल्या. गरीब ८ मुले दत्तक घेतली. शाळे मधील संगणक, प्रोजेक्टर च्या दुरुस्तीचा खर्च उचलला. गवाणे गावातील सर्व शाळेमधील २५० विद्यार्थ्यांना मोफत मास्क वाटप केले. व सॅनिटीझर मोफत दिले. तसेच भांबेड गावातील सर्पदंश ने मरण पावलेल्या लांबोर कुटुंबातील दोन्ही मुले दत्तक घेऊन त्यांची शिक्षणाची जबाबदारी घेतली. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा झापडे मधील ७ विद्यार्थी दत्तक घेतले.
या महान कार्याने संपूर्ण लांजा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात असलेल्या समाजसेवकाना एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. या कार्यामुळे ग्रामस्थांनी व मुलांनी देखील श्री. चंद्रकांत करंबळे यांचे आभार मानून सदैव ग्रामस्थ आपल्या सोबत असल्याची खात्री दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा