शिवजयंती उत्सव मित्र मंडळ नालासोपारा नागीनदास पाडा येथे केली झोकात शिवजयंती साजरी
प्रतिनिधी ( दीपक मांडवकर)
नालासोपारा: संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जन्मोत्सव म्हणून आनंदात साजरा केला जात असताना शासनाचे नियम पाळत नालासोपारा येथील प्रख्यात शिवजयंती उत्सव मित्र मंडळाने उत्साहात शिवजयंती साजरी केली. नवतरूनाणी बहरलेले हे मंडळ गेल्या पाच वर्षा पासून डोळे दीपावणारी शिवजयंती साजरी कारताना दिसत आहेत. सकाळी वसई किल्हा येथे शंकरांच्या मंदिरातून शिवजोत अभिषेख करून नादिनदास पाडा येथे पेटती जोत घेऊन हर हर महादेव आणि शिवरायांच्या घोषणा देत घेऊन येणारे शिवभक्त अगदी उत्साहित असतात. सकाळी प्रथम शिवरायांच्या मिर्तीवर अभिषेख करून सुवर्ण सुमानांच्या पालखी मध्ये विराजमान केले. तर विविध मंडळाच्या वतीने उपक्रम राबविण्यात आले. प्रथम सांस्कृतिक कार्यक्रमा आधी मंडळाचे विशेष सहकारी व मार्गदर्शक कै. राजेश पेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आणि मग रात्री मुलांचे सांस्कृतिक कर्यक्रमाचे छान आयोजन करताना रहिवाशांनी छान प्रतिसाद दिला. तर शिवरायांच्या पराक्रमाची गाथा हा पोवाडा बाळ शाहीर कु. वेदांत दीपक मांडवकर यांनी सादर करून रहिवाशांची माने जिंकली आणि सुस्वर संस्कृतीक भाजनाने शेवटी कार्यकटमची सांगता करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा