मराठा सामाजिक प्रतिष्ठान कळवा तर्फे रुग्ण सहायक श्री संदिप विष्णू कदम यांना "रणझुंझार मावळा" पुरस्कार

 

   


ठाणे ( प्रतिनिधी)

मराठा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) कळवा  या प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती सोहळा आयोजित केला होता.या प्रतिष्ठानने कोरोना रोग लक्षात घेता अत्यंत साध्या पध्दतीने शिवजयंती सोहळा आयोजित करून संपन्न केला. मार्च २०२० मध्ये कोरोना रोगाने  जगभरात तसेच भारतातील अनेक भागात थैमान घातले होते. अशा परिस्थितीत अनेक डॉक्टर , नर्स , हॉस्पिटल  कर्मचारी , पोलीस, अग्नीशामक कर्मचारी,  सफाई कामगार आणि विभागातील समाजसेवक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात  आपली जबाबदारी अत्यंत काटेकोर पाळली होती. मराठा सामाजिक प्रतिष्ठान मार्फ़त या सर्व कोरोना योध्दाचा सन्मान करण्यात आला. 

   श्री  संदिप विष्णू कदम हे एस एल रहेजा हॉस्पिटलमध्ये गेली अनेक  वर्षे रुग्ण सेवेचे  काम करत आहेत.  श्री संदिप विष्णू कदम यांच्या  कोरोना काळातील सेवाकार्याची दखल मराठा सामाजिक प्रतिष्ठान ने घेतली आणि त्यांना  "रणझुंझार मावळा " पुरस्कार देऊन कोरोना योध्दा म्हणून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

  मराठा सामाजिक प्रतिष्ठान चे पदाधिकारी आणि सर्व सभासद यांच्या वतीने शिवजयंती निमित्त अनाथ आश्रम मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले.

टिप्पण्या