"माणुसकीची भिंत "प्रतिष्ठान मुंबई, कलचरल अकॅडमी, रॉयल स्पीड ग्रूप वरळी या संस्थेमार्फत महिलाश्रम लांजा येथे आश्रमातील निराधार विद्यार्थी व महिला यांना शैक्षणिक साहित्य वाटप
लांजा (प्रतिनिधी) एक जबाबदार नागरिक म्हणून आपली काही सामाजिक जबाबदारी असते प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील काही भाग गरजू व गरीब लोकांना मदत म्हणून दिला तर समाजात एकही भुकेला किंवा निराधार राहणार नाही आणि तीच खरी ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन माणुसकीची भिंत प्रतिष्ठान मुंबई चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिपक कांबळे यांनी लांजा महिलाश्रम येथे केले.
"माणुसकीची भिंत "प्रतिष्ठान मुंबई, कलचरल अकॅडमी, रॉयल स्पीड ग्रूप वरळी या संस्थेमार्फत महिलाश्रम लांजा येथे आश्रमातील निराधार विद्यार्थी व महिला यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांना साड्या व चादर वाटप तसेच मास्क व सॅनिटायजर वाटप कार्यक्रम नुकताच करण्यात आला यावेळी दिपक कांबळे बोलत होते .
सदर प्रसंगी माणुसकीची भिंत प्रतिष्ठान, रॉयल स्पीड ग्रूपचे सर्व पदाधिकारी , महिलाश्रम लांजा कार्यवाहक श्रीम.विद्या बेलवलकर आणि कर्मचारी तसेच माजी सभापती श्रीकांत कांबळे,सेवानिवृत्त बॅक अधिकारी बबन कांबळे- माजळकर सचिव सुनील पालकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. दीपाली कांबळे ,संजय पवार, रवींद्र खैरे ,कमलेश भोसले, काशीनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा