माजी नगरसेवक श्री. किशोर नाना पाटील यांच्या मागणीनुसार वार्ड क्रमांक ३८ प्रमोद नगर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन शौचालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न

 


नालासोपारा ( प्रतिनिधी दीपक मांडवकर) 

नालासोपारा पूर्व विभागातील मोरगाव येथील माजी नगरसेवक श्री. किशोर नाना पाटील यांच्या मागणीनुसार वार्ड क्रमांक ३८ प्रमोद नगर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन शौचालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तर बहुजन विकास आघाडी लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर, आमदार क्षितिजदादा ठाकूर, माजी उप महापौर उमेश नाईक, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी सभापती भरतजी मकवाना, तसेच विभागीय अध्यक्ष अशोक भानसे, यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक यांच्या अथक प्रयत्नाने श्री. किशोर नाना पाटील, यांच्या मागणीनुसार वार्ड क्रमांक ३८ मध्ये प्रमोद नगर  एकता रहिवाशी संघ (११ सोसायटी) येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन विभागातील लोकांच्या गैरसोयीचे निवारण केले. त्या निमित्त शौचालयाचा लोकार्पण सोहळा दि २६/०१/२०२१ रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर लोकार्पण सोहळ्यात वार्ड क्र. ३८ चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एकता रहिवाशी संघाचे सर्व रहिवाशी व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. व या प्रमुह गैरसोयीचे निवारण केल्या बद्दल विभागातील नागरिकांनी श्री. किशोरजी पाटील यांचे आभार मानले.

टिप्पण्या