प्रवेश फि भरुनही काॅलेजने नाकारले, ठाण्यातील विद्यार्थ्याला भाजप कामगार आघाडीचे श्री महेश मोरे यांच्या प्रयत्नामुळे मिळाला प्रवेश
ठाणे शहरातील वैतीवाडी येथील कु.मानव तुकाराम
पागले यांने येथीलच ज्ञानसाधना काॅलेमध्ये इयत्ता 11 वी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज केला होता. अर्ज
आॅनलाईन असल्याने प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होईल याची त्याला खात्री होती.त्याने अर्ज
केल्यानंतर चांगले गुण असल्याने अंतिम आदीत प्रवेशही मिळाला.त्यांनतर त्याने काॅलेजच्या
प्रवेशासाठी फि ही आॅनलाईन भरली.आणि त्याला फि भरलेली पावतीही मिळाली. मात्र कु.मानव
हा अकरावीच्या वर्गात दाखल होताच त्याला काॅलेज प्रशासनाने तुझी प्रवेश प्रक्रिया
पुर्णच झाली नसल्याचे सांगितले.त्यामुळे या विद्यार्थाला आणि त्याच्या पालकांना धक्काच बसला.कारण
आत्तापर्यंत लाॅकडाऊनमुळे आधीच वेळ वाया गेला आणि आता प्रवेश मिळत नसल्याने एक वर्ष
वाया जाणार असल्याने सर्व कुटूंब विवंचनेत होते.
दरम्यान कु.मानव यांच्या कुटूंबियांपैकी मुलाचे मामा संजय भोस्तेकर यांनी भाजपा कामगार आघाडीचे नेते श्री महेश मोरे यांना घडला प्रकार सांगितला.श्री महेश मोरे यांनीही
प्रवेश प्रक्रिया तपासली असता कु.मानव यांने व्यवस्थित अर्ज भरला असल्याचे तपासले.याबाबत
त्यांनी सदर कुटूंबियांना न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिले.श्री महेश मोरे
यांनी आम.निरंजन डावखरे यांच्याही सदरची बाब लक्षात आणून दिली.याबाबत श्री मोरे
यांनी काॅलेज प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी कालेजची प्रवेश फि अजून
जमा झाली नसल्याचे सांगितले.परंतु विद्यार्थांकडे मात्र फि भरल्याची पावती
असल्याने यात अर्ज प्रक्रियेत कोणतीच चुक नसल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी विद्यार्थांचे नुकसान लक्षात घेता
आम.डावखरे यांनी काॅलेज प्रशासनासही धारेवर धरले.विद्यार्थ्याची कोणतीही चुक नाही.त्यामुळे सदरच्या विद्यार्थांला प्रवेश तातडीने द्यावा असे सांगितले.त्यामुळे काॅलेज
प्रशासनाने ते मान्य करीत कु.मानव तुकाराम पागले यास प्रवेश दिला.कु.मानव याचे
संपुर्ण वर्ष वाया जाता जाता वाचले. त्यामुळे मुलाच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रयत्न
करणाऱ्या आम.श्री निरंजन डावखरे आणि भाजपाचे कामगार नेते श्री महेश मोरे यांचे
कुटूंबियांनी आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा