शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षाचे प्रमुख नेते व महाविकासआघाडीतील मंत्र्यांसह शिवसैनिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
देशातील शिवसैनिकांप्रमाणे हा
माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा क्षण आहे. शिवसेना प्रमुख हे देशातील मोठे नेते
होते. त्यांचे विचार देशाला मार्गदशक ठरणारे आहेत. तसेच सर्व पक्षातील नेत्यांची
त्यांचे चांगले संबध होते. सर्व पक्षीय नेते मतभेद विसरून या कार्यक्रमाला आले.
याचे मला समाधान असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया
देताना म्हटले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा